उत्तप्रदेशातील शेतकर्यांना कर्ज माफी जाहिर ; महाराष्ट्रात का नाही
। राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांची सरकारवर टिका
अहमदनगर, दि. 06 - उत्तर प्रदेश सरकारने मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतकर्यांची कर्ज माफी जाहिर केली. मग महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या बाबतीत दुटप्पी भूमिका का ? राज्यातील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला असताना सत्ता असणार्या एक राज्यात कर्जमाफी करून येथील कर्जपायी आत्महत्या केलेल्या कुटुंबाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न सरकारने केल्याची टीका आमदार राहुल जगताप यांनी केली.कर्जमाफीबद्दल उत्तर प्रदेश सरकारचे जाहिर अभिनंदन करीत जगताप म्हणाले,
या सरकारला लोकहिताचा प्राध्यान्यक्रम ठरविता आलेला नाही. बुलेट ट्रेनसाठी लाखो रुपयांची तरतूद सरकार करत आहे. मात्र रोज एक शेतकरी आत्महत्या करत आहे, हे सरकारला दिसत नाही. जोपर्यंत हे सरकार कर्जमाफी करत मिळणार नाही तो पर्यंत सरकारविरोधात संघर्ष सुरुच आणि हा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल. महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या तीन वर्षापासून दुष्काळ, नापिकी, अवकाळी पाऊस गारपीट, शेती मालाला भाव नसने या व अशा अनेक कारणाने कर्जाखाली दबलेला आहे. त्याला सरकारच्या मदतीची गरज आहे. उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही सरकारने सर्व शेतकर्यांना कर्जमाफी द्यावी ही मागणी मी व माझे विधानसभेतील सर्व सहकारी विधानसभेत व विधानसभेबाहेर सातत्याने करत आहोत. त्यासाठी निवेदने मोर्चे, आंदोलने करत आहोत. परंतू हे सरकार शेतकर्यांना कर्ज मुक्त न करता मला व माझ्या सहकार्यांना निलंबीत करत आहे. परंतू शेतकर्यांच्या कर्जासाठी मी एकदाच काय दहा वेळा निलबंन घ्यायला तयार आहे. परंतू शेतकर्यांची कर्ज माफी झालीच पाहिजे त्यासाठी आपण कायम लढत राहणार आहे. उत्तर प्रदेश पेक्षा महाराष्ट्रामध्ये शेतकर्यांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. उत्तर प्रदेश सरकारने 36 हजार कोटीची कर्ज माफी केली आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र सरकाची 30 हजार कोटीची कर्ज माफी आहे. सरकारकडे 1.00 लाख कोटीचे ठेवीचे डिपॉझीट आहे त्यामधुन हि कर्ज माफी सहजरित्या करता येवू शकते. मा. कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या काळामध्ये 71 हजार कोटीची कर्जमाफी केली होती. मुळातच हे सरकार शेतकरी हिताचे नाही त्यामुळे शेतकरी कर्जमाफी साठी टोलवा टोलवी करत आहे. मेट्रोसाठी सरकारकडे पैसे आहेत परंतू शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत?
महाराष्ट्र सरकार हे फक्त घोषणाबाजांचे सरकार आहे. हे फक्त घोषणा करतात, प्रत्यक्षात काही करत नाही. हे सरकार शेतकर्यांना उध्दवस्त करत आहे. आता कोणत्याही शेतीमालाला बाजार भाव नाही. शेतकर्यांनकडे तुर, कांदा आहे परंतू खरेदी केंद्र सरकार चालु देत नाही. मागील अडीच वर्षात महाराष्ट्र राज्यात 9 हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्येचा हा दुर्दैवी उच्चांक आहे. राज्यातील शेतकरी सरकारच्या नावाने पत्रे लिहून आत्महत्या करत आहेत. असंख्य शेतकरी मृत्युपुर्वी लिहीलेल्या पत्रामध्ये सरकारने कर्ज माफी करवी ही अंतिम इच्छा व्यक्त करत आहे तरी देखील सरकार कर्ज माफी करत नाही.
या सरकारला कर्ज माफीचा निर्णय घ्यायला लावण्यासाठी सर्व शेतकरी बंधुंनी जात-पात, पक्ष-पार्टी सर्व विसरुन एक होणे गरजेचे आहे. तरी सर्वांनी या सरकारवर दबाव आणावा शेतकर्यांचे खरे कैवारी देशाचे मा. कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब संपुर्ण विरोधी पक्षासह शिवसेनाही लढत आहे. तरी शेतकर्यांनी या सर्वांना साथ द्यावी ही विनंती. शेतकर्यांना आम्ही सर्वोतोपरी मदत करत आहोत, ऊसाला चांगला बाजार, कुकडी जलयुक्त शिवार योजना, तालुक्यातील रस्ते दर्जेदार करण्यावर माझा भर आहे. फक्त घोषणाबाजी करुन लोकांचे मनोरंजन करणे मला आवडत नाही. त्यापेक्षा प्रत्यक्ष काम करण्यावर माझा भर आहे.