बैजल यांना दिल्लीच्या नायब राज्यपालपदाची शपथ
नवी दिल्ली, दि. 31 - दिल्लीच्या 21 व्या नायब राज्यपाल पदाची अनिल बैजल यांनी आज शपथ घेतली. राजनिवास येथे 11 वाजता त्यांचा शपथविधी पार पडला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरूवारी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. 1969 च्या आयएएस बॅचचे असलेले बैजल हे अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात गृह सचिव होते. परंतु मे 2004 मध्ये यूपीए सरकारने सत्तेवर येताच त्यांना पदावरून हटवले होते. मनमोहन सिंग सरकारच्या 60 हजार कोटी रूपयांचा महत्वकांक्षी प्रकल्प जेएनयूआरएममध्येही त्यांनी काम केले आहे.
अनिल बैजल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या थिंक टॅक विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन या संस्थेत बैजल यांनी कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केले होते.
अनिल बैजल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या थिंक टॅक विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन या संस्थेत बैजल यांनी कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केले होते.