सोरिन ग्रिनडेनू रोमानियाचे नवे पंतप्रधान
बुखारेस्ट, दि. 31 - रोमानियाच्या पंतप्रधान पदासाठी सोरिन ग्रिनडेनू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राष्ट्राध्यक्ष क्लाउस लोहानिस यांनी सोरिन ग्रिनडेनू यांच्या पंतप्रधानपदाच्या नियुक्तीवर शिक्का मोर्तब केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. ग्रिनडेनू यांच्या मंत्रिमंडळाच्या निर्मितीसाठी संसदेत विश्वासदर्शक ठराव संमत होणे आवश्यक आहे.
सोशल डेमोक्रॅटीक पक्षाच्या सेविल शैदेह या ग्रिनडेनू यांच्याबरोबर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होत्या. मात्र राष्ट्राध्यक्ष लोहानिस यांनी शैदेह यांचे नाव वगळले. त्यांची नियुक्ती झाली असती तर त्या देशाच्या पहिल्या मुस्लिम पंतप्रधान ठरल्या असत्या.