प्रा. सुरेश भागत यांनाबेस्ट कॉलेज प्रोजेक्ट टिचर अॅवार्ड
संगमनेर (प्रतिनिधी), दि. 24 - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स एक्सलंस प्रायोजित व डॉ. चंद्रशेखर अय्यर मेमोरियल ट्रस्ट यांच्यावतीने देण्यात येणारा बेस्ट कॉलेज प्रोजेक्ट टिचर हा पुरस्कार नुकताच पुणे विद्यापीठाचे इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख डॉ. अरविंद शाळीग्राम यांच्या हस्ते संगमनेर महाविद्यालयाचे इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे विभागप्रमुख प्रा. सुरेश भागवत यांना देण्यात आला.
बी. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स या विषयाचे जनक डॉ. आर. एन.कारेकर यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार सोहळा पुणे विद्यापीठाच्या इलेट्रॉनिक्स विभागात आयोजित करण्यात करण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपिठावर डॉ. अरविंद शाळीग्राम, डॉ. शशि गांगल, डॉ.दमयंती घारपुरे, श्रीमती कारेकर, आय.बी. एम.चे आदेश गोखले आदी मान्यवर उपस्थित होते.
इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील संशोधन प्रकल्प राष्ट्रीय, अांतरराष्ट्रीय चर्चासत्रामधील विशेष सहभाग, टिचर ट्रेनिंग प्रोग्राम इ.मधील विशेषता ओळखुन हा पुरस्कार देण्यात येतो. प्रा. सुरेश भागवत यांनी डॉ. चंद्रशेखर अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली मायक्रोप्रोसेसर बेस्ट पॅटर्न जनरेटर फॉर स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हा प्रकल्प पुर्ण केला होता. तसेच बी. सी. यु. डी. पुणे विद्यापीठ अंतर्गत डेव्हलपमेंट ऑफ पी.सी. बेस्ट लॅबोरेटरी एक्सप्रीमेंटस फॉर प्रिंन्सिपल्स ऑफ अॅनॉलॉग इलेक्ट्रॉनिक्स हा प्रकल्प व यु.जी.सी.अंतर्गत वेब बेस्ड टे्रनिंग अॅण्ड मेजरमेंट सेटअप फॉर ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस युजिंग मल्टिमिडीया अॅप्रोच हा प्रकल्प पुर्ण केला आहे. या व्यतिरीक्त विविध राष्ट्रीय-अांतरराष्ट्रीय परीषदांमध्ये संशोधन पेपर वाचन केले आहे. या सर्व बाबींचा विचार करुन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
या प्रसंगी बिट्स पिलानी राजस्थान येथील इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे मुख्य संशोधक डॉ.शशिकांत सदिस्तप, संगमनेर महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य व विभाग प्रमुख प्रा. राजेंद्र लढ्ढा, प्रा.प्रविण गर्जे, प्रा.शिवाजी पानसरे, प्रा.संजय भुसाळ, प्रा.भिमाशंकर बालोडे तसेच विभागातील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष बिहारीलाल डंग, कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सचिव डॉ. अनिल राठी, प्राचार्य डॉ. के. के. देशमुख व व्यवस्थापनातील सदस्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सहकारी वृंद व गणोरे येथील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.