इमानवर पुढील उपचार अबुधाबीत
मुंबई, दि. 27 - सैफी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेली जगातली सर्वात वजनदार महिला इमान अहमदला आता अबुधाबीला हलवण्यात येणार आहे. इमानवर पुढील उपचार अबुधाबी इथे करण्यात येणार आहेत अशी माहिती तिची बहीण शायमाने दिली.
अबुधाबीच्या बुर्जिल या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. इमानवर उपचार करणारे डॉक्टर लकडावाला यांनीच हे हॉस्पिटल सुचवलं आहे. मात्र इमानला डिस्चार्ज कधी मिळणार याची तारीख अजून सांगण्यात आलेली नाही. तीन दिवसांपासून बैठका सुरू आहेत पण हॉस्पिटल तिला डिस्चार्जही देत नाही अशी टीका इमानची बहीण शायमाने केलीय. हॉस्पिटलमध्ये इमानवर योग्य उपचार झाले नसल्याचा आरोप याआधी शायमाने केला होता.