Breaking News

जर्नालीलस्ट अ‍ॅक्टीव्हिजम फोरमच्या प्रयत्नाला यश, कचरावेचक महिलांना ओळखपत्र

। म.न.पा.विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांचा जर्नालीस्ट अ‍ॅक्टीव्हिजम फोरमच्या वतीने सन्मान

नाशिक, दि. 17 - जर्नालीष्ट अ‍ॅक्टीव्हिजम फोरमच्या प्रयत्नातून नाशिकरोड भागातील झोपडपट्टीत राहणार्‍या कचरावेचक महिलांच्या रोजगार व सुरक्षेसाठी,शासकीय स्थरावर ओळखपत्रांची गरज ओळखून असंघटीत कचरावेचक महिलांच्या हक्कासाठी कागदोपत्री यशस्वी पाठपुरावा केला. नाशिकरोड महापालिका विभागीय स्वच्छता व आरोग्य अधिकारी संजय दराडे यांनी महापालिकेकडून अधिकृतरीत्या 60 कचरावेचक महिलांना ओळखपत्रे (दि.9 मार्च 2017) प्रदान केली या बद्दल  जर्नालीष्ट अ‍ॅक्टीव्हिजम फोरमच्या पदाधिकारर्यांनी नाशिकरोड मनपा कार्यालयात जावून त्यांचा शाल,श्रीफळ,सन्मानपत्र देवून त्यांचा यथोचित सन्मान केला.या वेळी विभागीय अधिकारी संजय दराडे यांनी अश्या उपेक्षित कचरा वेचक महिलांना त्यांच्या हक्कासाठी यापुढे हि सन्मानाने ओळखपत्रे देण्यात येतील,प्रसंगी रोजगारासाठी सहकार्य केले जाईल असा शब्द दिला.
उपेक्षित ,दुर्लक्षित वर्गाच्या समस्या घेवून सामाजिक बदलासाठी कार्यरत जर्नालीष्ट अ‍ॅक्टीव्हिजम फोरमच्या पदाधिकारी मायाताई खोडवे यांच्या समुदाय पत्रकारितेच्या माध्यमातून नाशिकरोड भागातील कचरावेचक महिलांच्या प्रश्‍नावर प्रकाशझोत टाकण्यात आला होता.व्हिडीओ न्युज च्या माध्यमातून झोपडपट्टी भागातील मोलमजुरी करणार्‍या कचरावेचक महिलांच्या परिचयासाठी त्यांचेकडे कुठलेहि कागदपत्रे नव्हती.या कामी जर्नालीष्ट अ‍ॅक्टीव्हिजम फोरमच्या कागदोपत्री प्रयत्नाला यश आले. नाशिकरोड महापालिका विभागीय स्वच्छता,व आरोग्य निरीक्षक संजय दराडे यांनी याबाबत दाखल घेवून या मागणीला प्रतिसाद दिला.आणि सर्वोतोपरी यशश्‍वी निर्णय घेवून महापालिकेच्या माध्यमातून ऐन कचरावेचक 60 महिलांना महिलादिनी ओळखपत्रे प्रदान केली. या ओळखपत्रांची शाशकीय दप्तरी नोंद असल्याने रोजगारासाठी याची मदत होणार आहे.तसेच कामगार आयुक्त कार्यालयामार्फत मिळणार्‍या शाशकीय सेवा याद्वारे मिळवता येणार आहे.स्व सुरक्षा परिचय,तसेच कुटुंबाच्या स्वावलंबना साठी हे ओळखपत्र वापरले जाणार आहे .या कामी सामाजिक भान आणि कर्तव्याची जाणीव ठेवणार्‍या अधिकार्‍यांना हि त्यांच्या कामकाजात अजून उर्जा मिळावी, म्हणून जर्नालीष्ट अ‍ॅक्टीव्हिजम फोरमचे अध्यक्ष राम खुर्दळ,प्रवर्तक दादाजी पगारे,सचिव रमेश गणकवार,सहसचिव मायाताई खोडवे यांनी नाशिकरोड मनपा कार्यालयात जावून संवाद केला. व विभागीय स्वच्छता व आरोग्य निरीक्षक संजय दराडे यांचा शाल,श्रीफळ,फोरम चे सन्मानपत्र देवून सन्मानित केले. जर्नालीष्ट अ‍ॅक्टीव्हिजम फोरमच्या प्रयत्नातून या आधी हि बहुरूपी,विस्तापित,बेघर,बहुरूपी,लोककलावंत,शेतकरी,रेशन कार्ड पासून वंचित घटकांचे प्रश्‍न माध्यमाद्वारे तडीस नेवून त्यांच्या मागणीसाठी पाठपुरावा करून अनेकांना न्याय मिळवून सामाजिक कर्तव्य केले आहे. असे यावेळी प्रवर्तक दादाजी पगारे ,अध्यक्ष राम खुर्दळ यांनी सांगितले.