नवीन दारू दुकानांना परवाने देण्यास व्यसनमुक्त संघटनेचा विरोध
सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय डावलून सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी सुरु असणारी दारुची दुकाने बंद करण्यात यावीत. तसेच नवीन दारुच्या दुकांनाना परवानगी देण्यात येवू नये, अशी मागणी व्यसनमुक्त युवक संघाने जिल्हाधिकार्यांकडे केली. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांना निवेदन देण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सातारा जिल्ह्यात 503 दारु दुकाने बंद झाली. मात्र, तरीही हे दारुविक्रेते आपली दुकाने स्थलांरित करण्याचा प्रयत्न करणार आहेत. 50 % महिलांचा ग्रामसभेत ठरवा असल्याशिवाय नवीन ठिकाणी ग्रामपंचयात अथवा नगरपंचायत क्षेत्रात दारु दुकान सुरु करण्यास परवानगी देण्यात येवू नये. तसेच बोगस ग्रामसभा ठराव देणार्या सरपंच, उपसरंपच व ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. नगरपालिका क्षेत्रात वार्ड अथवा प्रभागनिहाय 50 टक्के महिलांनी संमती दिल्याशिवाय दारु दुकान सुरु करण्यास परवानगी देण्यात येवू नये.
सातारा जिल्ह्यात ज्या गावातून दारु बंदीची मागणी केली जाईल त्या गावातील 25 टक्के महिला मतदारांनी दारुबंदीची मागणी केल्यास त्वरित मतदान घेवून त्या गावातील दारुचे दुकाने बंद करुन महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देण्यात यावे. दरम्यान, रस्त्यावर घाण करणार्या व्यक्तींचे रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड रद्द करण्याची कारवाई करणार असल्याचे फलक लावून शासन प्रबोधन करत आहे. तर अशीच कारवाई शासनाने अवैध दारु विक्रेत्यांच्या विरोधात करावी, अशी मागणी व्यसनमुक्त युवक संघाने केली आहे. याबाबत व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष विलासबाबा जवळ, बाळासाहेब शेरेकर, दादासाहेब नरळे, सदानंद कापूरकर, दीपक बोराटे, पवन घाडगे, आनंदा चव्हाण, राजेंद्र चव्हाण, दिनेश जाधव, विक्रम कळसे यांनी निवेदन दिले.