Breaking News

प्रखर देशभक्तीचे प्रतीक म्हणजे डॉ.आंबेडकर - शिखरे

बुलडाणा, दि. 21 -  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्यांच्या जिवनचरीत्राचा एक-एक पैलु जरी सामान्य मानसांपर्यंत कथा, कांदबरी, कविता, चित्रपट, नाटके, यांच्यातुन पोहचला तरी भारताची वाटचाल खंबिर आणि बलशाली देशाभिमानी राष्ट्रात व्हायला वेळ लागणार नाही. कारण प्रथम देशभक्ती आणि शेवटीही देशभक्ती डॉ. बाबासाहेबांच्या नसानसात भिनली होती. प्रखर देशाक्तीचे प्रतीक म्हणजे बाबासाहेब होते, असे प्रतिपादन इतिहासकार तथा पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंता चंद्रशेखर शिखरे यांनी केले. संगम चौक येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी भाजपनेते योगेंद्र गोडे, माधवराव हुडेकर, सुनिल सपकाळ, मंगल हिवाळे, सौ. विजयाताई राठी यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना शिखरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महत्वाची देन म्हणजे संविधान संविधानाच्या माध्यमातुन देशाची वाटचाल गौरवास्पद होत आहे. सर्व सामान्यांपर्यंत बाबासाहेब पोहचविण्यासाठी साहित्य हे मोठे माध्यम आहे. कथा, कविता, गाणे, चित्रपट यांच्यामाध्यमातून हे कार्य प्रभावी होवु शकते, असे प्रतिपादन केले. तर कार्यक्रमाचे अतिथी बुलडाणा अर्बनचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विविध पैलु उलगडून दाखविले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अमोल हिरोळे यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. तर प्रास्ताविकात पत्रकार दिपक मोरे यांनी आयोजना मागची भ्ाुमिका विषद केली. लॉर्ड बुध्दा टि.व्ही.चॅनलच्या वतीने निर्मित ‘भारतका संविधान’ या हिंदी चित्रपटाची पार्श्‍वभ्ाुमी मांडून हा चित्रपअण लोकशाही मुल्य रुजविण्यासाठी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्य इतिहास मांडणारा असल्याचे मत त्यांनी मांडले.