Breaking News

खरगपूर ’आयआयटी’ मध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

कोलकाता, दि. 23 - आयआयटी खरगपूरच्या एरोस्पेस इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणार्‍या निधीन एन. या विद्यार्थ्याने वसतिगृहामध्ये छताला लटकून गळफास घेतला. ‘मला झोपू द्या’ अशी चिठ्ठी त्याने लिहून ठेवली होती. त्यावरुन त्याने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी निधीनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. आयआयटी खरगपूरमध्ये या वर्षात झालेली ही तिसरी आत्महत्या आहे. सकाळच्या वेळात निधीने लावलेला गजर वाजत होता. बराच वेळ होऊन देखील गजर बंद न झाल्याने काही विद्यार्थ्यांनी त्याच्या दरवाजावर थाप मारली परंतु त्याने काही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आम्ही वसतिगृह प्रशासनाला याबाबत कळवल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. यानंतर विद्यार्थ्यांनी खिडकीतून खोलीत पाहिले असता त्यांना निधीनचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला त्यानंतर पोलिसांना बोलविण्यात आले.