सत्ताधार्यांच्या नाकर्तेपणामुळे फेज-2चे कामच बंद पडले - रुपालीताई वारे
अहमदनगर, दि. 06 - मनपात केवळ सत्ताबदल झाला. आघाडीची सत्ता असताना जी कामे मंजुर झाली त्याचे फक्त उद्घाटने करुन विकासकामांचा देखावा फक्त सध्या सत्ताधारी करीत आहेत. फेज 2 सारख्या कामांमध्ये ठेकेदारांची बिले रखडविल्याने कामे बंद पडली असा आरोप नगरसेविका रुपालीताई वारे यांनी केला.
प्रभाग क्र.2 मधील डोकेनगर परिसरात बंद गटार पाईप योजना व रस्ता क्राँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ सौ.वारे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या सत्ताधार्यांच्या नाकर्तेपणामुळेच सावेडी, नगर शहर, उपनगरामधील फेज-2 ची कामे सध्या बंद पडली आहे. या मुळे रस्त्यांची कामे मंजुर असतानाही ती करता येइनात ठेकेदारांकडे बिले देताना वेगवेगळ्या मागण्या होत असल्याने ठेकेदारही वैतागले. बिले अडकल्याने त्यांना फेज-2 चे कामे करता येईना. यामुळे ती कामे त्यांनी बंद केली. तरी सत्ताधार्यांना त्याचे काहीच घेणे देणे नाही, असेही सौ.वारे म्हणाल्या.
प्रभाग क्र. 2 मोठा भाग आहे. उपनगरातील समस्यांसाठी नागरीक काम करणार्यांनाच प्राधान्य देतात आम्ही नागरीकांच्या एका फोनवर तत्परतेने प्रश्न सोडवितो. या भागाचा विकास हेच आमचे ध्येय असते. पण सत्ताधारी मात्र विकासकामात राजकारण आणुन खो घालतात फेज-2 कामे बंद पडल्याने रस्ते करता येइना. नागरीकांची प्रचंड नाराजी या सत्ताधार्यांवर आहे. फेज-2 चे काम तातडीने सुरु केले नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करणार असल्याचे निखिल वारे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी सुधीर जायभाय, राजेंद्र म्हसे, रविंद्र रोकडे, किरण आव्हाड यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. याप्रभागात सर्वात जास्त विकास कामे झाली. ती माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेविका रुपाली वारे यांच्या पाठपुराव्यांमुळेच झाली. यावेळी विकास घोडके, प्रविण गांगर्ड, सचिन गाडे, श्रीधर ढाकणे, नारायण गीते, मुंडलिक, रोकडे, भालसिंग, लवांडे, मुरकुटे, गायकवाड, केदार, जावळे, पोळ, नागुल, गुळवे, चत्तर, कातकडे, पोटे, दहातोंडे, गुटके, जाधव, म्हस्के, वावरे आदींसह महिला नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.