Breaking News

आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये आयोजित विविध आरोग्य शिबिराचा हजारो रुग्णांना फायदा

अहमदनगर, दि. 06 - रुग्ण सेवा व पैसा मिळविणे या दोन भिन्न गोष्टींची जाणीव ठेऊन समाजातील सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देणार्‍या आनंदऋषी हॉस्पिटलच्या कार्यात तनमनधनाने सेवा देणारे सर्वांसाठी आदर्शवत असल्याचे मत जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी व्यक्त केले.
श्री.आचार्य श्री.आनंदऋषी म.सा. यांच्या 25 व्या स्मृतीनिमित्तआंनंद ऋषी हॉस्पिटल मध्ये  श्रीमती बिजाबाई मोहनलाल राका व परिवार, डायलेसिस विभागाचे प्रमुख आधारस्तंभ श्री प्रकाश  मुनोत यांच्या सहकार्याने  आयोजित किडनी व तत्सम आजार तपासणी व उपचार शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ.सुजय विखे,  राका  परिवारातील श्रीमती बिजाबाई मोहनलाल ,सुर्यकांत, चंद्रकांत, किरण, संजय, मनोज, सौ.प्रितम, सौ.भारती, सौ.अनिता व  जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा,प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, महेश देशपांडे,प्रकाश मुनोत  अशोक पारख, डॉ. प्रकाश कांकरिया डॉ.वसंत कटारिया, नितीन कुंकूलोळ, तज्ञ डॉक्टर डॉ.भूपेशकुमार कवारे, डॉ.आनंद काशीद, डॉ.नीरज गांधी उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, दुसर्‍यांना आनंद व सेवा देण्यात खरे समाधान असून त्यासाठी जैन सोशल फेडरेशनचे कार्य अतुलनीय आहे. भविष्यात हे हॉस्पिटल जगातील सर्वसामान्य रुग्णांना अत्यंत माफक दरात सेवा देणारे हॉस्पिटल म्हणून ओळखले जाईल. यावेळी उपस्थित युवा नेते सुजय विखे यांनी सांगितले की आनंदऋषी हॉस्पिटल व पद्मश्री विठ्ठलराव विखे हॉस्पिटल यांच्या सहकार्याने सर्वसामान्यांसाठी आरोग्य सेवेचा अभिनव उपक्रम राबविण्यात येईल. प्रास्ताविक डॉ.वसंत कटारिया यांनी केले. नुकत्याच सुरु केलेल्या एमआरआय सेवेचा लाभ रोज 30 रुग्ण घेत असून फक्त 2 हजार रुपयांत एमआरआय केला जातो. अत्यंत अल्प दरात व दर्जेदार सेवा देण्याचे व्रत आनंदऋषी हॉस्पिटलचे असून त्याचा लाभ रुग्णांना मिळत आहे.