Breaking News

एमआयडीसीतील गुन्हेगारीची समस्या सोडवू - एपीआय चव्हाण

अहमदनगर, दि. 06 - नगरची एमआयडीसी ही मोठी औद्योगिक वसाहत असून, यातील उद्योजकांना भेडसावणार्‍या  गुन्हेगारी  समस्या प्राधान्याने  सोडवणार   असल्याचे  नव्याने नियुक्त झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी  सत्कारा उत्तर देताना सांगितले. सर्व उद्योजकांचा व्हॉटसअप ग्रुप असून, गरज पडल्यास उद्योजकांनी त्यावर आपल्या समस्या टाकण्यासाठी त्याचा वापर करण्याचे आवाहन  ही चव्हाण यांनी उद्योजकांना  यावेळी उपस्थितांना केले. उद्योजकांच्या आमी संघटनेच्या वतीने विनोद चव्हाण यांचा नियुक्तीबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात त्यांच्या जागी आधी कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पवार यांची बदली झाली. त्याबद्दल त्यांना निरोप देण्यात आला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष अशोक सोनावणे, दिलीप अकोलकर, संजय बंदिष्टी, मिलिंद कुलकर्णी, मिलिंद गंधे, श्रीहरी टिपुगडे, सावकार वाघमोडे, देवदत्त खाकाळ, सुतार व संघटनेचे सदस्य उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अशोक सोनावणे रात्री पोलीस गस्तीत वाढ करावी, त्यामुळे चोरीसारख्या घटनांवर आळा बसण्यास मदत होईल, असे सांगून उद्योजकांना भेडसावणार्‍या विविध समस्या सांगितल्या.