छगन भुजबळांना सजा की प्रायश्चित...!
दि. 06, एप्रिल - छगन भुजबळांच्या अवती भवती गराडा घातलेल्या मंडळींनी केलेल्या पापाची सजा ते भोगत आहेत.खरे तर ही सजा नाही तर प्रायश्चित आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही .मंञीपदाचा दिमाख मिरवण्यासोबत जबाबदारी समजून घेताली असती तर भुजबळांचा लगाम आणखी कुणाच्या हातात गेला नसता आणि ही वेळही आली नसती...
मंञी म्हणून छगन भुजबळ यांनी केलेली विकासाची कामे वादातीत आहेत. राजकारणात आवश्यक असते ती खमकी प्रवृत्ती भुजबळांमध्ये जन्मजातच आहे.त्यातच शिवसेनेसारख्या लढवय्या संघटनेत तावून सुलाखून निघालेले हे नेतृत्व शरद पवारांसारख्या मुत्सद्दी राजकारण्याच्या छायेखाली आल्यानंतर आणखी बेरके बनले.सत्तेत असून काम होत नाहीत ही सत्ताधारी आमदारांसोबत काही मंञ्यांची ओरड आपण ऐकतो.ती वेळ भुजबळांवर कधीच आली नाही.मंञीमंडळाच्या बैठकीत सर्व ताकद पणाला लावून विकासनिधी खेचून आणणारे मंञी म्हणून भुजबळांचा दबदबा होता.याच दबदब्यामुळे स्वपक्षातील जेष्ठ श्रेष्ठ दादा मंञ्यांच्या मनात भुजबळांविषयी असूयाही निर्माण झाली होती.मंञीमंडळ,सभागृह असो नाही तर समाज प्रत्येक स्तरावर नावाप्रमाणेच भुजांत बळ असालेला पाणीदार नेता अशी भुजबळांची प्रतिमा राज्यात तयार झाली होती.तेच भुजबळ वर्षभरापासून आर्थरच्या काळ कोठडीत बंद आहेत.कुठला सुड उगविला नियतीने?
भुजबळ यांच्यावर आलेली ही वेळ म्हणजे नियतीने उगवलेला सुड नाही तर भुजबळांनी केलेली चुक आहे.आपल्या महाराष्ट्रात एक म्हण आहे,गरीबी आली तर लाजू नये,श्रीमंती आली तर माजू नये..,तसेच सत्ता गेली तर हतबल होऊ नये अन् सत्ता आल्यावर उतू नये.छगन भुजबळ यांना हे उमगलं नाही.अर्थात व्यक्तीगत भुजबळांच्या बाबतीत बोलायचे झाले तर जनतेच्या रास्त हक्कासाठी भुजबळांनी सत्तेचा पुरेपुर वापर करून घेतला.त्यामागे प्रामाणिकपणा होता.भुजबळांभोवती गोळा झालेल्या मंडळींनी त्याचा अर्थ माञ स्वताच्या मनाप्रमाणे लावला आणि भुजबळांसारखाच रूबाब ती मंडळी दाखवू लागली.त्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत गेले.आणि सरते शेवटी भुजबळांच्या सत्तेचा लगाम या मंडळींच्या हातात कसा अन् केंव्हा गेला हे भुजबळांनाही समजले नाही,आर्थरची पायरी चढल्यानंतर लक्षाता आले असेल पण तोपर्यंत सारे पाणी इडीच्या समुद्रात वाहून गेले होते.बचावक्षेञात दुष्काळ पडला होता.प्रायश्चित घेण्याखेरीज भुजबळांच्या हातात अन्य पर्यायच उरला नव्हता आणि नाही देखील. भुजबळांना या अवस्थेत पाहण्यासाठी त्यांचे अनेक हितचिंतक संधीची वाट पहात होते.या सार्या मंडळींच्या सामुहीक प्रयत्नांनी ती संधी मिळाली.प्रत्येक जण आपआपला हिशेब चुकता करण्यासाठी धडपडत आहे,त्याचे सारे श्रेय भुजबळांचे कधी काळचे आप्तास्वकीय असलेले दादा,नाना,आण्णा ,भाऊ यांनाचा जाते.
मुंबई शहर इलाखा-उत्तर मुंबईतही तेवीस टक्क्यांचा व्हायरस
शहर इलाखा आणि उत्तर मुंबई साबां मंडळालाही तेवीस टक्के लाच स्वीकारण्याचा व्हायारसने ग्रासल्याची चर्चा आहे .कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके आणि श्रीमती परदेशी यांनी स्वतःसाठी वीस तर प्रकल्प निधी मंजूरीसाठी तीन टक्के दर ठरविल्याची चार्चा आहे.या हिशेबाप्रमाणे शहर इलाखा विभागात तीस कोटी पैकी जवळपास सात कोटी तर उत्तर मुंबईत जवळपास साडे अकरा कोटीचा लाच व्यवहार झाल्याची वाच्यता आहे. या संदर्भात तपशिलवार दखल उद्यापासून...