Breaking News

दिवट्यांचा माजच ठरतो भुजबळांचा कर्दनकाळ

दि. 07, एप्रिल - आण्णा, भाऊ, नाना ,दादा,अशा मंडळींवर छग भुजबळ यांनी ठेवलेला फालतू विश्‍वास पश्‍चातापास कारणीभूत ठरला. सत्ता भुजबळांच्या नावावर हैदोस माञ पंटर्सचा. सत्ता काळात या मंडळींनी प्रशासनावर केलेली दादागीरी भुजबळांना सव्याज  परत फेडावी लागत आहे. भुजबळांच्या सत्ताकाळात जे भोगलं त्याचा सुड प्रशासन घेत आहे असं म्हटल तर अतिशोयोक्ती ठरू नये...
महाराष्ट्र सदन घोटाळ्याशी सार्वजनिक बांधकाम मंञी म्हणून छगन भुजबळ यांचा थेट संबंध जोडला जाणे प्रथम दर्शनी संयुक्तिक वाटत असलं तरी चौकशीत तथ्य निष्पन्न होणं आवश्यक आहे. माञ त्यासाठी सरळ मार्गाने कुठलाही किंतू परंतूने पछाडलेला हेतू ठेवून चौकशी होऊ नये अशी अपेक्षा कुठल्याही कायदेशीर व्यवस्थेवर विश्‍वास असलेल्या माणसाने बाळगली तर गैर ठरू नये.भुजबळांच्या प्रकरणात माञ हे घडतांना दिसत नाही.हे प्रकरण जाणीवपूर्वक भिजते घोंगडं बनवून ठेवण्यात काही मंडळींना विशेष रस असल्याचे दिसते.
विशेषतः गृहमंञालय यात सुरूवाती पासून सहभागी असल्याचे दिसते.सोबत सार्वजनिक बांधकाम खात्यात भुजबळांसोबत राहून त्यांच्या विरोधात काम करणारी लाबीही भुजबळांभोवती चौकशीचे फास आवळण्याच्या दृष्टीने विशेष स्वारस्य दाखवित असल्याचे आजपर्यंतच्या घडामोडींवरून स्पष्ट होते.
जेंव्हा या प्रकरणाचा गवगवा होण्यास सुरूवात झाली तेंव्हा तत्कालीन गृहमंञी आर आर पाटील यांनी एसीबीला गुप्त चौकशीचे आदेश दिले होते.एसीबीचे तत्कालीन मससंचालक प्रविण दीक्षित यांनीच दिलेल्या अहवालात सारे फेटाळले होते.त्यानंतर किरीट सोमैय्या यांच्या पोपटपंचीने हे मढ उकरलं सन्माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाबरहुकुम नियुक्त केलेल्या विशेष समितीमार्फत पुन्हा तपास सुरू झाला. खासगी मुल्यांकन समितीही गठीत झाली.माञ या समितीचा अहवाल येण्यापुर्वीच एक दिवस आधी एसीबीने गुन्हा दाखल केला,आणि आता तेच प्रविण दीक्षित भाटगीरी करणार्या बोरूबहाद्दरांना हाताशी धरून खासगी मुल्यांकन समितीचा तपासाशी कोणताही संबंध नव्हता असा खुलासा करीत आहेत.आमचा तपास खासगी मुल्यांकन समितीवर आधारीत नव्हता म्हणून तो अहवाल कधी आला याला काही महत्व उरत नाही हे दीक्षित यांचे म्हणणे एकुणच तपासाच्या दिशेवर आणि हेतूवर शंका घेण्यास पुरेसे आहे,याचाच अर्थ कुठल्या तारी निमित्ताने भुजबळांभोवतीचे फास आवळायचे कारस्थान  सुरू आहे आणि त्याचे त्याचे सारे उत्तरदायित्व सत्ता काळात पंटर्सनी दाखवलेल्या माजावरच आहे.
मुंबई शहर इलाखा-उत्तर मुंबईतही तेवीस टक्क्यांचा व्हायरस
शहर इलाखा आणि उत्तर मुंबई साबां मंडळालाही तेवीस टक्के लाच स्वीकारण्याचा व्हायारसने ग्रासल्याची चर्चा आहे .कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके आणि श्रीमती परदेशी यांनी स्वतःसाठी वीस तर प्रकल्प निधी मंजूरीसाठी तीन टक्के दर ठरविल्याची चार्चा आहे.या हिशेबाप्रमाणे शहर इलाखा विभागात तीस कोटी पैकी जवळपास सात कोटी तर उत्तर मुंबईत जवळपास साडे अकरा कोटीचा लाच व्यवहार झाल्याची वाच्यता आहे. या संदर्भात तपशिलवार दखल उद्यापासून...