Breaking News

आरबीआयनं वाढवला ’रिव्हर्स रेपो रेट’!

मुंबई, दि. 06 - रिझर्व्ह बँकेचं पहिलं द्वैमासिक पतधोरण जाहीर झालंय. रेपो रेटमध्ये रिझर्व्ह बँकेने कोणताही बदल केलेला नाही. रेपो रेट 6.25 टक्के कायम ठेवण्यात आलाय तर रिव्हर्स रेपो रेटमध्ये 6 टक्के करण्यात आलाय. बाजारामध्ये जास्त रोख उपलब्ध आहे असं जेव्हा आरबीआयला वाटतं तेव्हा रिव्हर्स रेपो रेट वाढविलं जातं... ज्यामुळे जास्त व्याज मिळवण्यासाठी ही रोख रक्कम लोक बँकेत जमा करतील, अशी धारणा आहे.
रेपो रेट म्हणजे ज्या दरानं बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणार्‍या कर्जदरात वाढ होणं. साहजिकच  ग्राहकांना बँकांकडून महागात कर्ज मिळणार रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट आहे. यात रिझर्व बँक वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपानं पैसे घेत  असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.