शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नाहीत : राष्ट्रवादी
नवी दिल्ली, दि. 19 - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत नाहीत, असं पक्षातर्फे पहिल्यांदाच अधिकृतपणे सांगण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस डीपी त्रिपाठी यांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं. शरद पवार हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असणार का, या प्रश्नावर उत्तर देताना त्रिपाठींना हे जाहीर केलं. ‘पवार हे आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांनी या पदांसाठी रेसमध्ये असण्याचा प्रश्नच नाही. काही इतर नेते हे निवडणूक लढवणारे असतील. मात्र पवार बिल्कुल नाही, असं उत्तर त्रिपाठी यांनी दिलं.
काहीच दिवसांपूर्वी शरद पवारांना ‘पद्मविभूषण’ प्रदान करण्यात आलं. यावेळी पवारांचं नाव राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चा होत्या. जुलैमधे राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. दुसरीकडे, सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार घोषित करावं, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यानंतर भागवतांनी ही मागणी गांभीर्याने न घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर एनडीएच्या बैठकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याशी राष्ट्रपतीपदाबाबत चर्चा झाल्याचं म्हटलं जातं.