Breaking News

चिंचवड येथे बेकायदेशीर मोबाईलची विक्री करणार्‍या तिघांना अटक

पुणे, दि. 26 - बेकायदेशीर मोबाईलची विक्री करणार्‍या तीन तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 11 मोबाईल अणि 1 मोटारसायकल जप्त केली आहे.  ही कारवाई चिंचवडमधील पांढरकर चाळ परिसरात आज (मंगळवार) चिंचवड पोलिसांच्या पथकाने केली.
या प्रकरणी गोविंद शिवाजी अवतारे (वय 18, रा. दळवीनगर, चिंचवड) विष्णू संजय शिगवण (वय 18, रा. ओटास्कीम, निगडी) आणि त्यांचा अल्पवयीन साथीदार याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (दि. 25) चिंचवडमध्ये पांढरकर चाळ परिसरात तिघे जण अनोळखी लोकांना मोबाईल विक्री करण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या परिसरात पाळत ठेवून या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चिंचवड, पिंपरीतून 11 मोबाईल चोरल्याची कबुली दिली. तसेच अ‍ॅक्टिव्हा मोटारसायकल पुण्यातील बंडगार्डन परिसरातून चोरल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून 11 मोबाईल, 1 अ‍ॅक्टिव्हा मोटारसायकल असा 1 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक विनायक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, जयवंत राऊत, सुधाकर आवताडे, विलास साळवे, शांताराम हांडे, स्वनिल शेलार, देवा राऊत, विजय बोडके, दीपक मैराळ, सुरज उबाळे, किसन शिंदे, विनोद साळवे, विनायक साळुंखे यांनी केली.