Breaking News

जिल्हास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीची बैठक संपन्न

पुणे, दि. 26 - जिल्हास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीची बैठक आज जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली झाली.पुणे जिल्ह्यातील वितरण व्यवस्था,केरोसिनचे वाटपाचे कमी करण्यात आलेले प्रमाण तसेच गोडोऊनची धान्य साठवण्याची क्षमता,पी ओ एस मशीन मुळे आलेली पारदर्शकता,तसेच जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी मोहीम,ई-रेशनकार्ड,सिलेंडर वितरण या सर्व गोष्टींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
सध्या केवळ आधारकार्ड धारकांनाच केरोसीन पुरवठा करण्यात येतो,येत्या काळात पुणे जिल्ह्यात केरोसीन वापराचे प्रमाण शून्य टक्के बनवण्याच्या दिशेने आमची वाटचाल सुरु आहे,असे प्रतिपादन पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार यांनी यावेळी केले. या बैठकीत दक्षता समितीचे अशासकीय सदस्य विजया शेंडे,ज्योती गायकवाड,चेतन अग्रवाल,निहाल घोडके,अमृत शेवकरी,निलेश जठार आदी सदस्यांनी ग्राहकांच्या वतीने त्यांच्या समस्या मांडल्या. त्यांचे उत्तर देताना शक्य तितक्या लवकर त्याचे निराकरण करण्यात येईल, असे आश्‍वासन श्री. भालेदार यांनी दिले.