सह्याद्रि व्याघ्र प्रकल्पामार्फत लाजम येथील आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
कराड, दि. 5 (प्रतिनिधी) : महाबळेश्वर तालुक्यातील लामज येथे सह्याद्रि व्याघ्र प्रकल्पामार्फत आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिरामध्ये लोकांची नेत्र तपासणी, दंत तपासणी, पोटाचे आजार व सामान्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर या आजारांची व इतर प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. तसेच महिलांचे आजारांवर स्वतंत्र तपासणी करण्यात आली. शिबिरामध्ये सर्व वयोगटातील मुले, महिला व पुरुष अशा एकूण 150 लोकांची तपासणी करण्यात आली.
शिबिरादरम्यान सह्याद्रि व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक डॉ. विनिता व्यास यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, डॉक्टरांसोबत चर्चा करून शिबिरासाठी यापुढेही सहकार्य करण्याचे आवाहन केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी उपजीविका तज्ज्ञ श्रीकांत कुंभार, वनपाल योगेश गावित, वनरक्षक बबन राठोड व संभाजी नाईक यांनी सहकार्य केले.
व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील महाबळेश्वर तालुक्यातील गावांमध्ये सर्व वयोगटातील लोकांसाठी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरामध्ये लामज, उचाट, वाघावळे, कांदाट, निवळी गावातील ग्रामस्थ सहभागी झाले होते. या शिबिरास सातारा येथील डॉ. संदीप श्रोत्री, डॉ. स्वाती श्रोत्री, डॉ. मिलिंद शहा, डॉ. शशिकांत पवार, डॉ. बोधे, डॉ. उपेंद्र पवार, डॉ. बोधे, डॉ. अश्विनी सोनवलकर, डॉ. सिध्दार्थ जोशी, स्वप्नाली गायकवाड, प्रिया कदम, सुप्रिया भोसले, श्रध्दा करांडे यांचे सहकार्य लाभले.