Breaking News

एटीएम मधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलाला 30 हजार रूपयाला गंडा

अहमदनगर, दि. 23 - राहुरी शहरातील अ‍ॅक्सीस बॅकेच्या एटीएम मशीन मधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने हातचलाखी करत एका अल्पवयीन मुलाला 30 हजार रूपयेला गंडा घातल्याची घटना दिनांक 22 एप्रिल रोजी सकाळी घडली. 
शहरातील गाडगे महाराज आश्रम शाळा येथील रहीवाशी असलेला सौरभ संजय सुर्यवंशी वय 16 वर्षे हा मुलगा पैसे काढण्यासाठी 22 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान राहुरी बस स्थानक समोरील अ‍ॅक्सीस बॅकेच्या एटीएममध्ये गेला होता. यावेळी सौरभला पैसे कढणे जमत नसल्याने त्याच्या मागे रांगेत उभा असलेल्या एका भामट्याने तूला पैसे काढून देतो असे म्हणून सौरभ जवळील एटीएम कार्ड घेतले व त्याला मशिन मधून दहा हजार रूपये काढून दिले. यावेळी त्या भामट्याने हातचलाखी करून एटीएम कार्डची अदला बदल केली. सौरभ दहा हजार रूपये घेऊन घरी गेला तेव्हा एटीएम कार्ड बदली झाल्याचे त्याला समजले. सौरभने तातडीने आपल्या आईला सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत सदर भामट्याने सुर्यवंशी यांच्या खात्यावरील 30 हजार रूपये काढून पसार झाला होता. सदर भामट्याने आपल्याला 30 हजार रूपयेला गंडा घातल्याचे लक्षात येताच सुर्यवंशी यांनी पोलिसांत धाव घेऊन गुन्हा रजि. नंबर फस्ट 135/ 2017 भादंवि कलम 406 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पूढील तपास सहाय्यक फौजदार उजे करत आहे.