रेणुका महिला स्वयंसाह्यता गटाचे हळदी - कुंकू संपन्न
अहमदनगर, दि. 02 - रेणुका महिला स्वयंसहायता गटाच्या वतीने गंजबाजार येथे हळदी-कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमास महापौर सुरेख कदमा उपस्थित होत्या. गटाच्या अध्यक्षा योगीता देवळालीकर यांनी उपस्थितांना बचतगटाची माहिती दिली. यानिमित्त महिलांसाठी काही खेळही ठेवण्यात आले होते. महापौर कदम यांनी महिलांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती दोशी यांनी केले. कार्यक्रमास रेणुका डावरे, सुधा डावरे, बार्शीकर, गुळवे तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
