Breaking News

क्रीशाली व लक्ष्मी स्वामीला निकालापूर्वीच 3 लाखाचे पॅकेज

अहमदनगर, दि. 26 -  अ.नगर महाविद्यालयातील संगणक विभागातील गुणी विध्यार्थ्यांना आयटी क्षेत्रातील कंपन्यांकडून नोकरीच्या चांगल्या संधी व पॅकेजस यापूर्वी मिळाले असून यंदाही निकालापूर्वीच एमसीएस शेवटच्या वर्षाची विध्यार्थिनी कु.क्रीशाली परमार हिला पुण्याच्या टेक महिंद्रा कंपनीत 3 लाखाचे पॅकेज मिळाले आहे. या कंपनीत टेक्निकल सपोर्ट या पदावर ती सध्या कार्य करीत आहे. तसेच एमसीए ची शेवटच्या वर्षाची विध्यार्थिनी लक्ष्मी स्वामीला पुणे येथील अ‍ॅमडॉक्स कंपनीचे 5 लाखाचे पॅकेज मिळाले असून परफॉरर्मंस टेस्टिंग इंनजीनियर पदावर ती कार्यरत आहे. अ.नगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या हस्ते कु.क्रीशाली परमारव लक्ष्मी स्वामी या संगणक विभागातील विध्यार्थिनीची (टेक महिंद्रा) व (अ‍ॅमडॉक्स पुणे)  कंपनीत निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य नंदकुमार सोमवंशी , रजिस्ट्रार ए.वाय.बळीद संगणक प्रमुख प्रा.सय्यद रज्जाक सर  उपस्थित होते.