Breaking News

विकास कामे करताना राजकीय जोडे बाजूला ठेवावेत - प्रा.शिंदे

। पाणीटंचाईच्या काळात सर्वांना पाणी मिळाले पाहिजेत 

अहमदनगर, दि. 05 - पायाभुत विकास आराखडयामध्ये तालूक्यातील तीन नवीन उपकेेद्रे एक उपके्रद्रांत पॉवर टान्सफार्मरची क्षमता वाढविणे 2 उपकेंद्रात अतिरिक्त  1 पॉवर टान्सफार्मर बसवून क्षमता वाढविणे वाडया वस्त्या विदयूतीकरण व 301 नवीन रोहित्र बसविणे इ. कामांचा समावेश आहे. असे एकुण 42 कोटींची कामे सुरू आहेत. विकास कामे करताना राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. तरच या मतदार संघाचा विकास होईल. असे जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी तालूक्यातील साकत येथील 33 केव्ही उपकेद्राचे भूमीपूजन करताना व्यक्त केले.याच वेळी टंचाईच्या काळात सर्वांना पाणी मिळाले पाहिजे. यामध्ये हलगर्जी होता कामा नये. असा सुचक इशारा अधिकार्‍यांना दिला.
पायाभूत विकास आराखडा 2 या योजनेअतर्गत 33/11 केव्ही उपकेंद्र साकत येथे भूमीपूजन समारंभ दि. 4 रोजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या वंदना लोखंडे, सोमनाथ पाचारणे, मुख्य अभियंता दिपक कुमठेकर ,अधिक्षक अभिंयता दत्तात्रय कोल्हे, अधिक्षक अभियंता नाशिक भुजंगराव खदांरे, पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड,उपसभापती सुर्यकांत मोरे, माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर, रविंद्र सुरवसे, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, संचालक सुभाष जायभाय,  साकतचे सरपंच कांतीलाल वराट, माजी संरपच हनुमंत पाटील, दिलीप बाफना,प्रविण सानप, मनोज राजगूरू, डॉ ज्ञानश्‍वेर झेंडे, सोमनाथ राळेभात, अमित चिंतामणी, केशव वनवे,पांडूरंग उबाळे ,विलास मोरे, लहु शिंदे, महारूद महारनवर, शरद काका भोरे, रामभाऊ रसाळ, रामकिसन जायभाय, उपकार्यकारी अभियंता संदीप शिंदे, एस.एस.पगारीया, युवराज परदेशी ,जिवन चव्हाण ,प्रकाश शेळके,  यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. शिंदे म्हणाले की, जून अखेर पर्यत पायाभूत सुविधा विकास आराखडा 2 ची कामे पूर्ण करणे. आवश्यक असून आज होत असलेल्या साकत उपकेेंद्रासाठी 3.50 कोटी निधी मंजूर झाला असुन या उपके्ंरद्रातून साकत ,कोल्हेवाडी, पिंपळवाडी, कडभणवाडी, मोहा, नानेवाडी, रेडेवाडी, हापटेवाउी, दैवदैठण ,धामणगांव,नाहूली या गावातील 750 कृषी पंप ग्राहकांना व 1350 घरगूती वाणिज्य व ओैद्योगिक ग्राहकांना योग्य दांबाने विज पुरवठा होणार आहे.या उपकेद्राचे काम जून अखेरपर्यंत पूर्ण होणार आहेत.  तालूक्यात तरडगांव उपकेंद्राचे काम एप्रिल पर्यंत पुर्ण होणे अपेक्षीत आहे. यामुळे भारनियमन कमी होवून शेतक-यांना दिलासा मिळणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीमध्ये आपण जनतेने माइयावर विश्‍वास दाखवला या प्रात्र राहून विकास कामे करणार आहे. तसेच तिर्थक्षेत्र आराखडयात मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात आला आहे. टंचाईच्या काळात सर्वांना पाणी मिळाले पाहिजे. यामध्ये हलगर्जी होता कामा नये. असा सुचक इशारा अधिकार्‍यांना दिला.