आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत एमआरआय मशिनचे लोकार्पण
अहमदनगर, दि. 05 - आचार्य सम्राट श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या आशिर्वादाने व जैन सोशल फेडरेशनच्या सातत्यपुर्ण सहकार्यांने सुरु असलेल्या आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सेवा कार्यामध्ये अधिकाधिक चांगल्या गुणवत्तेच्या मशिनरीची भर पडत असून, एम.आर.आय.या अत्याधुनिक तंत्राज्ञानाने विकसित असलेल्या मशिनचे लोकार्पण हा त्याचाच एक भाग असल्याचे प्रतिपादन प्रबुद्ध विचारक प.पू.आदर्शऋषीजी म.सा. यांनी केले.उद्घाटनाच्या सुरुवातीला उपस्थितीत सर्वांनी नवकार मंत्राचा जाप करुन या सेवा कार्यास प्रारंभ केला.
हे मशिन कार्यान्वित करण्यासाठी प्रसिद्ध उद्योजक व पारस उद्योग समुहाचे संचालक माणकचंदजी पेमराजजी बोथरा व परिवार, धनराजजी श्रीश्रीमाळ व सौ.कमलबाई श्रीश्रीमाळ व परिवार, व सी.ए. रमेश फिरोदिया, सौ.सविता फिरोदिया व परिवार तसेच श्री. फुलचंदजी बाठिया व सौ.चंचलबाई बाठिया व परिवार यांचे मोठे योगदान लाभले आहे. श्री बडीसाजन ओसवाल भवन येथे संपन्न झालेल्या उद्घाटनप्रसंगीच्या सोहळ्यात सहयोगी सर्व दानशुर परिवारांच्या ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे कोनशिलेचे अनावरण करुन व फित सोडून या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.प्रकाश कांकरिया यांनी सर्वांचे स्वागत केले.
जैन सोशल फेडरेशनच्यावतीने संतोष बोथरा यांनी सर्व दानशूर व्यक्तींचे आभार मानून या एमआरआय मशिनची सेवा 24 तास चालू राहणार असून, अवघ्या दोन हजार रुपयांमध्ये एमआरआय करणारे हे राज्यातील एकमेव हॉस्पिटल असल्याचे ते म्हणाले, हे एम.आर.आय.मशिन सिमेन्स या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या कंपनीने निर्मित केलेले असून त्याचे नाव मॅग्नोटोम इस्सेन्सा ऐ-टीएम.व डॉट सिस्टीम इ 11 या आत्याधुनिक प्रणालीचे असून हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षित असा स्टाफही असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी युवाचार्य प.पू.महेंद्रऋषीजी म.सा., कुंदनऋषीजी म.सा., हितेंद्रऋषीजी म.सा., परागमुनी, राममुनी, प.पू.साध्वी किरणप्रभाजी म.सा., विरागदर्शनाजी म.सा., विपुल दर्शनाजी, कंचन कंवरजी, अर्चनाजी आदि ठाणा याप्रसंगी उपस्थित होते. या एमआरआय सेंटरसाठी योगदान देणारे बोथरा परिवारातील सदस्य पेमराज, संतोष, सतीश, पारस, सुवालाल, राजू बोथरा, सौ.मंगला रुणवाल, सी.ए. रमेशजी फिरोदिया, सौ.सविताताई फिरोदिया, नरेंद्र मुनोत, श्री.धनराजजी श्रीश्रीमाळ, सौ.कमलबाई श्रीश्रीमाळ, प्रमोद, संजय भाऊ, प्रशांत श्रीश्रीमाळ, फुलचंदजी बाठिया, सौ.चंचलबाई फुलचंदजी बाठिया (पुणे) यासर्व योगदात्यांचा जैन सोशल फेडरेशनच्यावतीने विशेष सन्मान करण्यात आला. आदर्शऋषीजी म.सा. यांनी यापुढे बोलताना आनंदऋषीजी हॉस्पिटलने स्थापनेपासून आजपर्यंत रुग्णांच्या सेवेचे फार मोठे कार्य उभे केले असून, लवकरच भव्य असा नेत्रालयाचे काम सुरु असून लवकरच नगरकरांच्या सेवेमध्ये रुजु होणार आहे असे सांगून यापुढे ही हॉस्पिटलच्या सेवेमध्ये अधिकाधिक चांगल्या सेवेची भर घालण्याचा आमचा प्रयत्न राहिल असे सांगितले.
या उद्घाटनाच्या कार्यक्रमात अखिल भारतीय जैन कॉन्फरन्सचे अध्यक्ष मोहनलालजी चोपडा, समाजभुषण हस्तीमलजी मुनोत, सतीश लोढा, डॉ.वसंत कटारिया, विलास लोढा, डॉ.सुधा कांकरिया, राजू भटेवडा, सुनिल भंडारी, निखिलेंद्र लोढा, अभय गुगळे, हेमराज बोरा, मदनलाल दर्डा, पृथ्वीराज धोका, राजू बोरा, बाळासाहेब बोरा, पोपटलाल ओस्तवाल, विशाल शेटीया, व्हि.डी.खाबीया यांनीही समयसूचित भाषण करुन हॉस्पिटलच्या सेवा कार्यास शुभेच्छा दिल्या. डॉ. आशिष भंडारी यांनी आभार मानले.