दोन दिग्गज भिडणार, सचिन-लारा पुन्हा मैदानात
त्रिनीदाद, दि. 24 - क्रिकेट जगतातील हिरो सचिन की लारा? हा 90 च्या दशकातील सर्वाधिक चर्चेचा विषय होता. क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले हे दोन दिग्गज पुन्हा एकदा एकमेकांविरोधात खेळताना दिसणार आहेत. क्रिकेटप्रेमींना वेस्ट इंडिजमध्ये होणार्या या सामन्यात अनेक दिवसांनंतर वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा आणि टीम इंडियाचा माजी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या खेळाचा आनंद घेता येणार आहे.
सचिन विरुद्ध ब्रायन लारा यांच्यातील सामना एका खास स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये 13 मे रोजी हा सामना होईल. गेल्या 10 वर्षांपासून तयार करण्यात येत असलेलं ब्रायन लारा स्टेडिअम 13 मे रोजी आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी खुलं होणार आहे. सचिन आणि लारा यांच्याव्यतिरिक्त या सामन्यात आणखी कोणकोणते खेळाडू असतील, याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. मात्र सचिन आणि लारा एका मैदानावर दिसणार हे निश्चित झालं आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमींना या सामन्याचा आनंद घेता येईल. या सामन्याच्या तिकीट विक्रीलाही सुरुवात झाली असून प्रेक्षकांची तिकीट खेरदीसाठी झुंबड उडाली आहे.
या सामन्याचं प्रक्षेपण वेस्ट इंडिजसोबतच जगभरात केलं जाणार आहे. टारोबा स्टेडियमची निर्मिती 275 मिलियन डॉलरमध्ये 2005 मध्ये सुरु करण्यात आली होती आणि 2007 च्या विश्वचषकासाठी हे मैदान तयार होईल, असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र करोडो रुपये खर्च करुनही हे मैदान वेळेवर तयार होऊ शकलं नाही. स्टेडिअमच्या निर्मितीची प्रक्रिया वादात सापडली. त्यानंतर चौकशीसाठी समितीची नियुक्ती करण्यात आली आणि 2010 साली मैदानाच्या निर्मितीच्या प्रक्रिया पुन्हा सुरु झाली. त्यामुळे आता क्रिकेट विश्वातले दोन दिग्गज या मैदानात खेळून शुभारंभ करणार आहेत.