Breaking News

मळगंगादेवी पालखी मिरवणुकीचे नेवासा नगरीत उत्स्फुर्त स्वागत

नेवासा, दि. 29 - नेवासा येथील एस.टी.स्टँड जवळ असलेल्या भाऊ घोलप यांच्या वखार प्रांगणातील मळगंगादेवी मंदिरामध्ये निघोज येथून आलेल्या पालखी सोहळा सांगता प्रसंगी आयोजित भंडारा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यानिमित्ताने नेवासा शहरातून काढण्यात आलेल्या श्री मळगंगादेवी च्या पालखी मिरवणूकीचे नेवासेकरांनी फटाक्यांच्या आतशबाजीने स्वागत करण्यात आले.
मंगळवारी दि.25 एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमा प्रसंगी पारनेर तालुक्यातील निघोज येथून आलेल्या श्री मळगंगादेवीच्या पालखीची विधिवत पूजन मंदिराचे पुजारी रेणुकादास उर्फ़ भाऊ घोलप सौ.सुमनताई घोलप,परसराम घोलप,सौ.लताताई घोलप,राम घोलप,सौ.ज्योतीताई घोलप,सचिन घोलप व सौ.जयश्री घोलप,संदीप घोलप व सौ.भारती घोलप यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी निघालेल्या श्री मळगंगादेवी पालखी मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.वाजत गाजत निघालेल्या या मिरवणुकीचे नेवासा शहरातील चौकाचौकात स्वागत झाले असंख्य भक्तांनी पालखीतील मळगंगा देवीचे दर्शन घेतले.
या मिरवणुकीत एकनाथ वाघ,मनोज गोयर,अनिल शिंगी,सागर घोलप,शाम घोलप आदि भाविक सहभागी झाले होते मिरवणुकीचा समारोप मंदीर प्रांगणात झाल्यानंतर मळगंगादेवीची महाआरती करण्यात आली.यावेळी अंबिलासह हजारो  भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यानिमित्ताने रात्री मळगंगादेवी मंदिरासमोर जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला यावेळी ही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारनेर तालुक्यातील निघोज येथे 19 एप्रिल रोजी झालेल्या श्री मळगंगादेवी मंदिर नेवासा ते निघोज अशी पायी पालखी दिंडी नेवासा येथून दि.14 एप्रिल रोजी काढण्यात आली होती हया पालखी दिंडीचे 25 एप्रिल रोजी नेवासा येथे आगमन झाले या निमित्ताने मंगळवारी पालखी उत्सव सांगता सोहळा येथे वरील कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.