Breaking News

देव जेथे येतात तेथ दुःख दैन्य व दारिद्र राहात नाही-श्री ह.भ.प.वासुदेव महाराज मुंडे

बीड, दि. 08 - केज तालुक्यातील कासारी या ठिकाणी चालत असलेल्या प्रतिवर्षाप्रमाणे चालेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाची सांगता काल्याच्या किर्तनाने झाली. श्री.ह.भ.प.वासुदेव महाराज मुंडे शास्त्री गोपीनाथगड यांचे कल्याचे किर्तन झाली. 
काल्याचे किर्तनासाठी श्रीमंत श्री तुकाराम महाराज  यांचा अभंग किर्तन निरुपणासाठी घेेतला.
गोकुळी सुखा ज्ञ अंतपार नाही । लेखा ्॥ बाळकृष्ण नंदाघरी । आनंदल्या नरनारी ्॥ अभंगावर श्री.ह.भ.प.वासुदेव महाराज मुंडे शास्त्री यांनी श्रोत्यांना मंत्र मुग्ध  केले. गोकुळे शब्दाचा अर्थ महाराजांनी सांगताना असा  सांगितल की गों-इंद्रिय -कुळ-समुह म्हणजे इंद्रियांचा समुह म्हणजे गोकुळ असा अर्थ सांगितला. तसेच  त्यामुळे गोकुळात सवृत्र आनंद झाला आणि त्या सुखाला अनंतपार
राहिला नाही. गोप, गोपीका गोपाळांना यांना पण आनंद झाला त्यांनी तो आनंद-गुडीया, उभा केल्या, दरवाज्याला तोरणे बांधली, कथा केलया, गाणी गायली,  वेदाचे मंत्र/ऋचंयांचे पठन केले. आणि  भगवान श्रीकृष्णांचा त्यांना छंद लागला आणि भगवांताने या सर्व भक्तांचे मन,बुध्दी, चित्ता आणि अंतःकरण आपल्याकडे  ओढुन घेतल तसेच सर्वांना मोहून टाकले. असे निरुपण श्री.ह.भ.प.वासुदेव महाराज मुंडे गोपीनाथ गडकर यांनी केले. यावेळी कार्यक्रमास विशेष उपस्थिती  लाभलेले श्री.डॉ.संभाजीराव वायबसे, श्री निवृत्ती हजारे (कासारी सरपंच), श्री. सुखदेव वायबसे  (कासारी उपसरपंच) श्री आण्णासाहेब वायबसे (सर) अदि  मान्यवर उपस्थित होते.  यांनी पण किर्तनाचा आनंद घेतला. व महाप्रसादाचा लाभ घेतला आणि सर्व गावकरी  मंडळी व मान्यवरांनी श्री.ह.भ.प.वासुदेव महाराज  मुंडे शास्त्री गोपीनागड यांचे आभार व्यक्त केले आणि  पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.  किर्तनसाठी मृदंगसाठी श्री.ह.भ.प.ज्ञानेश्‍वर महाराज व विष्णु महाराज यांनी  केली आणि गायकनाची साथ-श्री ह.भ.प.सुनिल महाराज घुले, (घुलेची टाकळी), अशोक महाराज यांनी केली तसेच किर्तनासाठी भजनी मंडळ उपस्थित,  तांबवा, डोका,उमरी, विडा, घुलेची टाकळी, केज, सातेफळ अदि पंचक्रोषीतील भंजनी मंडळ व भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी किर्तन श्रवणाचा  व महाप्रसादाचा लाभ घेतला.