Breaking News

जीवन विकासच्या दीक्षास ऑस्ट्रियाच्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक

लातूर, दि. 08 - ऑस्टियातील ग्रात्स येथे दि.14 ते 25 मार्च दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पेशल ऑलिम्पिक हिवाळी क्रिडा स्पर्धेत जीवन विकास प्रतिष्ठान  संचलित मतिमंद विद्यालय,लातूरची दीक्षा गायकवाड हिने फलोअर हॉकी सांघिक खेळात भारतीय संघास कांस्य पदक प्राप्त करुन दिले.
सदर स्पर्धेमध्ये भारतातील 130 खेडाळूंनी भाग घेतली, जगातील 105 देशातील तब्बल 2600 खेळाडू या दिव्यांगाच्या क्रिडा स्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये  भारताने 73 पदकांची कमाई केली.
लातूरच्या मतिमंद विद्यालयाची दीक्षा गायकवाड हिने कांस्य पदक पटकावले. क्रिडा शिक्षक  उदय गोजमगुंडे व सहकार्‍यांनी तिला मार्गदर्शन केले. तिच्या यशाबद्दल  संस्थेेचे अध्यक्ष जयसिंगराव देशमुख,उपाध्यक्ष डॉ.एम.एस.कुलकर्णी, कांताप्रसाद राठी, सचिव रामानूज रांदड, सहसचिव दीनानाथ भुतडा, शांतीलाल कुचेरिया,  कोषाध्यक्ष बाबूराव सोमवंशी, मतिमंद विद्यालयाचे चेअरमन वैजनाथअप्पा लातूरे, मूकबधीर विद्यालयाचे चेअमरन चेतन सारडा, सौ.सुशीलादेवी देशमुख मूकबधीर  विद्यालयाचे चेअरमन श्रीरंग शर्मा ,सर्व  संचालक, मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश जवळे, मूकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक खांडेकर,  सौ.सुशीलादेवी देशमुख विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनिता कुलकर्णी, तसेच शिक्षक व कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे.