लातुरात काँग्रेसची गुंडगिरी, भाजप उमेदवाराच्या पतीवर उकळता चेहा फेकून मारहाण
लातूर, दि. 18 - लातूरमध्ये राजकीय हाणामारीची घटना घडली आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवार असलेल्या शीतल मालू यांचे पती शिवकुमार मालू यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली आहे. शीतल मालू या लातूर महापालिका निवडणुकीत भाजपकडून प्रभाग क्रमांक 16 मधून उमेदवार आहेत.
धक्कादायक म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवकुमार मालू यांच्यावर उकळता चहा फेकला आणि त्यानंतर जबर मारहाण केली. निवडणुकीत प्रचार करु नको. व्यवसायात लक्ष घाल, असे धमकावत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केली. शिवकुमार मालू यांना लातूरमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दहा महापालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर लातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. या तीन महापालिकांसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे, तर 21 एप्रिलला मतमोजणी होईल.