लॅम्बॉर्गिनी फेम आमदार नरेंद्र मेहतांच्या कंपनीला 79 कोटीचा दंड
मुंबई, दि. 22 - भाजपचे लॅम्बॉर्गिनी फेम आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीला महसूल खात्यानं 79 कोटीचा दंड ठोठावला आहे. घोडबंदर रोडवर मेहता यांच्या कंपनीनं एका रहिवाशी इमारतीचं बांधकाम सुरु केलं आहे. मात्र ज्या जमिनीवर ही इमारत उभी राहणार आहे तिथं आधी भलामोठा खड्डा होता. तो खड्डा भरण्यासाठी खनिजयुक्त मातीचा वापर करण्यात आला. जो कायद्याच्या विरोधात आहे.
त्यामुळे या कंपनीला 79 कोटी 42 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. नरेंद्र मेहता अर्थसंकल्पीय अधिवेशनात 3 कोटीच्या आलिशान लॅम्बॉर्गिनी गाडीनं आले होते. ज्याची भलतीच चर्चा विधीमंडळात होती. दरम्यान, याप्रकरणी मेहता यांनी आपण उद्या प्रतिक्रिया देऊ असं म्हटलं आहे. नरेंद्र मेहता हे मीरा भाईंदरचे आमदार आहेत. निवडणूक जाहीरनाम्यात त्यांची संपत्ती ही 18 कोटींच्या घरात आहे.
नरेंद्र मेहता हे सेव्हन इलेव्हन ग्रुप ऑफ कंपनीचे मालक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या पत्नीच्या वाढदिवसाला ही आलिशान लॅम्बॉर्गिनी गिफ्ट दिली होती. पहिल्याच दिवशी त्यांच्या पत्नीने याच गाडीने रिक्षाला धडक दिली होती. त्यामुळे याच कारमुळे नरेंद्र
मेहता चर्चेत आले होते.