जि.प.सभापती पद भाजपा 3 राष्ट्रवादी 1
बुलडाणा, दि. 06 - मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषद समित्यांच्या सभापती पदासाठी आज 5 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. यावेही भाजपाला 3 तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1 सभापती पद मिळाले. यामुळे घाटाखाली दोन आणि घाटावर दोन सभापती पदे मिळाली आहेत.
जिल्हा परिषदेत आज समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी विशेष सभेचे आयोजने जि.प.अध्यक्षा सौ.उमाताई तायडे यांनी केले होते. यावेळी झालेल्या निवडणुकीमध्ये समाज कल्याण सभापती पदाकरीता गोपाल रामदास गव्हाळे व शिला धनसिंग शिंपणे यांचे दोन अर्ज प्राप्त झाले होते. यावेळी झालेल्या निवडणुकीत गोपाल गव्हाळे यांनी शिला शिंपणे यांचा पराभव केला. अर्थ व बांधकाम सभापती पदासाठी राजेंद्र उमाळे व राजाभाऊ अर्जुन भोजने या दोघांचे अर्ज प्राप्त झाले होते. यात राजेंद्र उमाळे यांची अर्थ व बांधकाम सभापती पदासाठी वर्णी लागली.
महिला व बालकल्याण सभापती पदाकरीता उंद्री सर्कलच्या सौ.श्वेताताई महाले पाटील व सौ.ज्योती पडघान यांचे अर्ज प्राप्त झाले होते. यात श्वेताताई महाले पाटील यांनी ज्योतीताई पडघान यांचा पराभव केला. तर कृषी व पशुसंवर्धन सभापती पदी राष्ट्रवादीचे दिनकर देशमुख यांनी श्रीराम मापारी यांचा पराभव करीत कृषी व पशुसंवर्धन सभापती पदी वर्णी लावली. सर्व उमेदवार हे 34-26 या फरकाने निवडूण आलेत. त्यामुळे भाजपाला 3 तर राष्ट्रवादीला 1 असे सभापतीपदे पदे बहाल करण्यात आली.
यावेळी जि.प.अध्यक्षा सौ.उमाताई शिवचंद्र तायडे, उपाध्यक्षा सौ.मंगलाताई रायपुरे, जि.प.मु.का.अ.दिपा मुधोळे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे आदिंसह जि.प.सदस्यांची उपस्थिती होती.