Breaking News

तरूणास उपचारासाठी 1 लाखची आर्थीक मदत

बुलडाणा, दि. 06 - तालुक्यातील मौजे काटोडा येथील रहिवासी रामकृष्ण निवृत्ती थिगळे या टॅक्टर चालकाचा अपघात झाल्याने त्याच्या मेंदुला जबर इजा होण्याबरोबरच दोन्ही पाय फॅक्चर झाले होते. त्यामुळे सदर तरूणास उपचारासाठी औरंगाबाद येथील मॅक्स हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले होते. या उपचारासाठी येणारा मोठा खर्च पाहता या तरूणास आमदार राहुल बोंद्रे यांनी पुढाकार घेवून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 1 लाख रूपयाची आर्थीक मदत मिळवून दिली.
आमदार राहुल बोंद्रे यांच्या प्रयत्नामुळे मंजुर 1 लाख रूपये मदतीच्या युटीआरचे पत्र जनसेवा कार्यालयात त्यांच्या नातेवाईकाकडे आज दिनांक 05 एप्रिल रोजी सुपूर्द करण्यात आले.
यावेळी वेळी चिखली तालुका कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष विष्णु पाटील कुळसुंदर, यु.कॉ.अध्यक्ष रमेश सुरडकर, शिवदास रिंढे, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्‍वर सुरूशे, ईश्‍वराव इंगळे, विठल गिरी, भिकनराव ठेंग, पिंटु गायकवाड, संजय गिरी, संजय सोळंकी, ज्ञानेश्‍वर सोळंकी, महादेव भालेराव, आदिंची  उपस्थिती होती.