वन कॉइन कंपनीच्या 18 जणांना अटक
नवी मुंबई, दि. 25 - लोकांना झटपट श्रीमंत होण्याचे आमिष दाखवून पैशांची गुंतवणूक करण्यास भाग पाडणार्या वन कॉइन कंपनीच्या 18 जणांना पोलिसांनी आज अटक केली आहे. गुंतवणूकदारांकरिता या कंपनीचे मोबाइल अॅपदेखील आहे, परंतु भारतात आर्थिक व्यवहाराची परवानगी नसतानाही ही कंपनी नागरिकांकडून कोट्यवधी रुपये गुंतवणूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. असाच एक कार्यक्रम जुईनगर येथे एमएलएम मार्केटिंगच्या माध्यमातून सेमिनार सुरू असताना छापा टाकण्यात आला. या व्हच्र्युअल चलनाची माहिती देऊन यात आताच गुंतवणूक केली तर अधिक फायदा होईल, असे आश्वासन दिले जात होते.
त्या ठिकाणावरून 18 एजंटांना पोलिसांनी अटक केली आहे. बीट कॉइन या कंपनीच्या आधारावर 2014 मध्ये वन कॉइन ही ऑनलाइन एमएलएम कंपनी विदेशात स्थापन झालेली आहे. ही मार्केटिंग कंपनी अनेक देशांत त्यांच्या एजंट्समार्फत जाळे पसरवत आहे. या कंपनीत होणारी गुंतवणूक ही आंतरराष्ट्रीय चलनाच्या दराच्या चढ-उतारावर क्रिप्टो या चलनाशी आधारित आहे, अशी माहिती सांगितली जात होती.