Breaking News

वाशी विभागात शहराच्या सौंदर्यास बाधा करणार्‍या 17 जणांवर गुन्हा




नवी मुंबई, दि. 28- नवी मुंबई महापालिकेच्या वाशी विभागात शहराच्या सौंदर्यास बाधा करणारया 17 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. अमरीश पटनिगीरे यांच्या नियंत्रणाखाली, वाशी विभागाचे विभाग अधिकारी श्री. महेंद्रसिंग ठोके व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सहाय्याने ही मोहीम हाती घेण्यात आली होती.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अतिक्रमणे निष्कासित करून तसेच मार्जिनल स्पेस खुल्या करून, पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले हटवून वाहतुकीला व रहदारीला पदपथ व रस्ते मोकळे असावेत असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. दिले आहेत. वाशी विभागातील विविध ठिकाणच्या सार्वजनिक पोस्टर, बॅनर लावून, तसेच भिंतीवर रंग रंगोटी, रस्त्याच्या चौकात, झाडावर, दिवाबत्ती पोल वर जाहिरातीचे फलक उभारून शहराच्या सौंदर्यास बाधा करणा-या 17 जणांवर महाराष्ट्र मालमत्तेचे विरुपणास प्रतिबंध अधिनियम 1995 कलम 3 अनव्य, वाशी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले.