नवी मुंबईत 3 लाख 30 हजार 500 रुपये एमडी पावडर जप्त
नवी मुंबई, दि. 28- कोपरखैरणे येथे एमडी रॉक आणि एमडी पावडर मफेड्रोन हा अमली पदार्थ विकणार्या एका नायझेरीयन नागरिकाला अटक करण्यात आले आहे. आरोपीचे नाव युगोचुकू नेयाडी (वय 37) आहे, अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. यात 25 ग्राम एमडी रॉक व 85 ग्राम पावडर आढळून आली त्याचे बाजार मूल्य 3 लाख 30 हजार 500 रुपये आहे. अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत हि कारवाई करण्यात आली आहे.
एक नायझेरीयन नागरिक अमली पदार्थ विर्कीस येणार असल्याची माहिती पोलिसाना मिळाली होती. खबक्षययाने दिलेल्या माहितीच्या आधारावर सलग 3 दिवस सापाला लावण्यात आला. कोपरखैरानेतील सेक्टर 18 ए मधील जनविकास सोसायटी समोरील गेट परिसरात सापळा लावला होता गुरुवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली त्याची झडती घेतली असता त्याच्या कडे मँफोड्राम जे एम डी रोकं हे अमली पदार्थाची पावडर आढळून आली.