धनंजय देसाईसह 15 जण निर्दोष
पुणे, दि. 27 - खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय जयराम देसाई (वय 40, रा. हिंदूगड मु. पो. पौड, ता. मुळशी) यांच्यासह इतर 15 आरोपींची खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून जिल्हा न्यायाधीश एस. जी. गिमेकर यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
विनायक सुरेश चव्हाण (वय 24 रा. जनता वसाहत, जनवाडी), किरण कृष्णा बांद्रे (वय 36), योगेश बाबासाहेब मानकर (वय 28), रवी मल्लेश जेल्ली (वय 26), दशरथ बाळू चव्हाण (वय 26), विजय आत्माराम तेरकर (वय 34), मंगेश वसंत धुमाळ (वय 30), सचिन शंकर बांदरे (वय 33), दादासाहेब महादेव बारगजे (वय 30), देवेंद्र दशरथ भंडारे (वय 28), राम विठ्ठल वाघमारे (वय 29), बाळा दत्तात्रय येळवंडे (वय 33), शरद अंकुश नामदास (वय 28), संजय आत्माराम तेरकर (वय 30, सर्व रा. जनवाडी जनता वसाहत) व धनंजय देसाई अशी निर्दोष मुक्त झालेल्यांची नावे आहेत.
मिलिंद पवार व भालचंद्र पवार यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले, की देसाई यांनी कटकारस्थान केले व गुन्हा घडविला असा पोलिसांनी पूर्णपणे खोटा आरोप करून जाणीवपूर्वक या गुन्ह्यात गुंतविले. घटनेच्या वेळी देसाई घटनास्थळी नव्हते. तो ग्राह्य धरून सर्व आरोपींची मुक्तता करण्यात आली. दरम्यान हडपसर येथील मोहसीन शेख खूनप्रकरणी देसाई आरोपी असून, येरवडा कारागृहात आहे. या खून खटल्याची सुनावणी अद्याप येथील न्यायालयात सुरू आहे.