Breaking News

आंब्याच्या पेटीतून 12 लाखांची लाच, ठाण्यातील आयएएस अधिकारी अटकेत

ठाणे, दि. 16 - ठाण्यात आदिवासी विकास खात्याचे उपायुक्त किरण माळी यांना लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद गवादे यांनी 12 लाखांची लाच मागितली होती. आंब्याच्या पेटीमधून 12 लाख रुपयांची लाच स्वीकारताना माळींना अटक करण्यात आली आहे. तसंच आयएएस अधिकारी मिलिंद गवादेंनाही अटक करण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत विभागाने शनिवारी ही कारवाई केली आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला या आयएएस अधिकार्‍यांनी लाच मागितल्याची तक्रार मिळाली. त्यानुसार आदिवासी विकास खात्याचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद गवादे यांच्यासाठी सापळा लावण्यात आला होता. मात्र ही 12 लाख रुपयांची लाच स्वीकारणार्‍या किरण माळींना रंगेहाथ पकडण्यात आलं. रात्री उशिरा मिलिंद गवादे यांनाही पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली आहे. आदिवासी विकास खात्यातील एका कर्मचार्‍याकडे पदोन्नतीसाठी 12 लाख रुपयांची लाच देण्याची मागणी गवादेंनी केली होती.