संभाव्य उमेदवाराच्या हत्येचा कट, उपमहापौरासह 10 जणांवर गुन्हा
मुंबई, दि. 21 - भिवंडी-निजामपूर शहर महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. संभाव्य उमेदवाराच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी उपमहापौर, स्थायी समिती सभापती, नगरसेवकासह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आमनेसामने भिडत असून एकमेकांचे जीव घेण्याचे प्रकार घडत आहेत. राजकीय वैमनस्यातून काँग्रेसचे पालिका गटनेते मनोज म्हात्रे यांची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच प्रभाग क्र. 2 मिल्लतनगर येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवाराची हत्या करण्याचा कट विद्यमान उपमहापौर, स्थायी समिती सभापती, नगरसेवक यांच्यासह
दहा जणांच्या साथीने रचल्याचं उघड झाल्यानं शहरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सभापती इमरान वली मोहम्मद खान, काँग्रेस नेता मेहबूब उर्फ बबलू अंसारी, उपमहापौर अहमद हुसेन सिद्दीकी, भरत पवार, फिरोज डायमंड, अर्शद अंसारी व त्यांचे चार अज्ञात साथीदार हे हत्येच्या कटातील आरोपी आहेत.