पुण्यासाठी 100 इलेक्ट्रॉनिक बसेसची खरेदी
पुणे, दि. 21 - पुण्यासाठी 100 इलेक्ट्रॉनिक बसेसची खरेदी करण्याचा महत्त्वपूर्णनिर्णय स्मार्ट सिटी योजनेच्या बैठकीत घेण्यात आला. इलेक्ट्रॉनिक्स बसची चाचणी घेऊन मगच त्या खरेदी करण्याचा विचार स्मार्ट सिटी योजनेच्या बैठकीत मांडण्यात आला. यासाठी चाचणीसाठी 3 कंपन्यांनी तयारी देखील दर्शविली आहे.
16 पैकी 11 कंपन्या या इलेक्ट्रोनिक बस पुरविण्यासाठी इच्छुक होत्या. परंतु, तत्पूर्वी होणार्या बस चाचणीसाठी मोफत बस पुरविण्याचा विचारही या बैठकीत मांडण्यात आला. यानंतर 3 कंपन्यांनी चाचणीसाठी मोफत बस पुरविण्याचे मंजूर केले आहे. प्रत्येकी एक अशा 3 बस चाचणीसाठी देण्यात येणार असून, याचा चालक हा कंपनीचा असणार आहे. तर, वाहक हा पीएमपी प्रशासनाचा असेल. विशेष म्हणजे लिथियम बॅटरीवर चालणार्या या बससाठी पालिका मोफत वीज पुरवणार आहे. ज्यामुळे प्रदुषणही कमी होईल.या बैठकीला स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष नितीन करीर, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, विरोधी पक्ष नेते चेतन तुपे आदी उपस्थित होते.