Breaking News

बेस्ट कर्मचार्‍यांना पगारात 10-10 ची नाणी, पिशवी घेऊन जाताना....

मुंबर्ई, दि. 22 -गेल्या अनेक दिवसांपासून तोट्यात चाललेल्या बेस्ट कर्मचार्‍यांना पगार देताना, प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहेत. कर्मचार्‍यांचा या महिन्यातील पगार भागवताना तर प्रशासनाला चिल्लर द्यावी लागली. जवळपास 30 हजार कर्मचार्‍यांना त्यांच्या पगारातील काही हिस्सा चिल्लर स्वरुपात देण्यात आला. प्रत्येक कर्मचार्‍याला 10-10 रुपयांची 50-50 नाणी देण्यात आली.
बेस्ट प्रशासनाने कर्मचार्‍यांना 20 एप्रिलला पगार दिला. यावेळी ड्रायव्हर, कंडक्टर यांच्यासह हजारो कर्मचार्‍यांना नाण्यांच्या स्वरुपात पगार अदा केला. 50 नाणी पिशवीतून घेऊन घरी जाणं कर्मचार्‍यांना मोठं जिकीरीचं झालं. सध्या बेस्टकडे नाण्यांस्वरुपात 1 कोटी 30 लाख रुपये आहेत. सर्व नाणी 10-10 ची आहेत. प्रवाशांनी दिलेले हे सुट्टे पैसे आहेत. आरबीआय किंवा अन्य बँकांनी हे सुट्टे पैसे ठेवण्यास नकार दिला आहे.  त्यामुळेच ही नाणी कर्मचार्‍यांना पगारारुपात देत आहोत, असं बेस्टचे जनरल मॅनेजर जगदीश पाटील यांनी सांगितलं.