मियामी ओपन : फेडरर, नडाल उपांत्यपूर्व फेरीत
मियामी, दि. 29 - मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत चतुर्थ मानांकित रॉजर फेडररने बॉटिस्टा अगुट याला 7-6 (7-5), 7-6 (7-4) असे पराभूत केले. स्पर्धेत चौदाव्या मानांकित बॉटिस्टा अगुटने फेडररला विजयासाठी चांगलेच झुंजवले. दोन्ही सेटचा निकाल टायब्रेकरमध्ये लागला. फेडररने या विजयासह स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
पाचव्या मानांकित राफेल नडालनेही स्पर्धेच्या उपांत्यपूर्व धडक मारली. त्याने बिगरमानांकित निकोलस माहुतला 6-4, 7-6 (7-4) असे पराभूत केले. पहिला सेट नडालने सहज जिंकला. मात्र दुसरा सेट अटीतटीचा झाला. अखेर टायब्रेकरमध्ये अनुभवाच्या जोरावर नडालने सामना जिंकला.