जिल्ह्यात पंचायत समिती सभापती व उपसभापती जाहीर
बुलडाणा, दि. 15 - जिल्ह्यात 13 पंचायत समित्यांसाठी 16 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान पार पडले. या निवडणूकीची मतमोजणी 23 फेब्रुवारी रोजी झाली. विद्यमान सभापती व उपसभापती यांचा कार्यकाळ 13 मार्च 2017 रोजी संपुष्टात आला. त्यानुसार आज 14 मार्च 2017 रोजी पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडून आलेल्या सदस्यांमधून सभापती व उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. त्यामध्ये काही सभापती व उपसभापती ईश्वर चिठ्ठीने निवडण्यात आले. पंचायत समितीनिहाय सभापती व उपसभापती पुढीलप्रमाणे :
बुलडाणा ः आज झालेल्या पं.स.सभापती व उपसभापती पदासाठी बुलडाणा पंचायत समिती सभापती साठी 3 तर उपसभापती पदासाठी 4 नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली होती. यामध्ये सभापती पदासाठी तस्लीनादी रसूल खान, अरुणा श्रीकांत पवार, रुपाली विशाल सोनुने अशी तीन उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली होती. तर उपसभापती पदासाठी नंदिनी कल्याणकर, विनोद जाधव, अरुणा श्रीकांत पवार, कविता अनंत लहासे अशी चार नामनिर्देशने दाखल करण्यात आली. सभेला पुर्ण 12 सदस्य उपस्थित होते. नामनिर्देश मागे घेण्यासाठी दिलेला वेळ संपल्यानंतर रुपाली विशाल सोनुने यांनी आपली अर्ज मागे घेतल्याने तस्लीनाबी रसूल खान व अरुणा श्रीकांत पवार हे दोन उमेदवार शिल्लक राहिले. उमेदवारांसाठी मतदान घेण्यात येवून तस्लीनाबी रसूल खान यांना 6 तर अरुणा श्रीकांत पवार यांना 5 मते मिळाली त्यामुळे सभापती पदी तस्लीनाबी रसूल खान (काँग्रेस) यांची निवड झाल्याचे आरडीसी नरेंद्र टापरे यांनी जाहीर केले. तसेच उपसभापती पदाकरीता असलेल्या चार उमेदवारांपैकी विनोद कडूबा जाधव, अरुणा श्रीकांत पवार यांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने नंदिनी कल्याणकर व कविता अनंत लहासे यांच्यामध्ये निवडणूक घेण्यात आली. या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 6 मते मिळाल्याने उपसभापती पदाची निवड ईश्वरचिठ्ठीने करणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार एका दिव्या नावाच्या लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली यामध्ये कविता अनंत लहासे (भारीप बमसं) यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांची उपसभापती पदाकरीता निवड करण्यात आली.
जळगांव जा. ः पंचायत समिती जळगांव जा. सभापती व उपसभापती पदाची निवडणुक घेण्यात आली. जळगांव जा.पं.स.चे सभापती व उपसभापती पद भाजपाकडे राहिले. निवडणूक प्रक्रीकरीता या करीता मा.श्री धनंजय ए.गोंगटे यांची पिठासीन अधीकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली होती सदर निवडीची सभा आज 14 मार्च 2017 रोजी दुपारी 2:00 वाजता घेण्यात आली. सभापती पद अनुसुचीत जमाती महीला साठी राखीव होते. त्या पदासाठी सौ.गिताबाई तेजसिंग बंडल ह्यांचा एकमेव अर्ज आला. त्यांचा वैधरित्या अर्ज दाखल झाल्याने त्यांची अविरोध सभापती म्हणुन निवड झाली. तर उपसभापती पदाकरीता दोन अर्ज आले होते रामेश्वर नारायण राऊत व सौ. विमल रामेश्वर कळस्कार या पैकी रामेश्वर राऊत यांना सर्वाधीक 4 तर सौ विमल कळस्कार यांना 3 मते मिळालीत. रामेश्वर राऊत यांची उपसभापती पदी निवड जाहीर करण्यात आली. संपुर्ण निवडणुक प्रक्रीयेत गविअ चोपडे, तहसिलदार हेळकर, दिक्षीत, नायब तहसिलदार व श्री भोंगे निवडणुक लिपीक म्हणुन उपस्थित होते.
संग्रामपूर ः संग्रामपुर पंचायत समीती मध्ये दि. 14 मार्च रोजी सभापती उपसभापती पदाकरीता निवडणुक झाली. त्यामध्ये पं.स.गणातुन विजयी उमेदवार एकुण 8 विजयी उमेदवारासह पं.स.संग्रामपुर चे डॉ.डि.आर.हिरोळे संग्रामपुर तहसिलचे तहसिलदार एल के चव्हान तथा निर्वाचण विभागाचे कनिष्ठ लिपीक एस.ए.दाभोड यांचे समोर सह वर्षीय मुलगा चि.ईशान दिपक दाभाडे या बालकाच्या हस्ते ईश्वरीचिठठीव्दारे निवडणुक प्रक्रीया पुर्ण करण्यात आली. त्यामध्ये सभापती पदाच्या बि.जे.पी.नवनियुक्त सभापती म्हणुन सौ.तुळसाबाई भारत वाघ यांची निवड करण्यात आली तसेच उपसभापती करीता मतदान घेण्यात आले त्यामध्ये चार अधिक तिन व एक तटस्थ राहिल्यामुळे एकुन पाच मतांनी भाजपाच्या सौ.उज्वला नंदकिशोर घायल यांना विजयी घोषीत करण्यात आले. तिन वर्षापुर्वी चे जिजाबाई प्रकाश धामोळे नंतर तिन वर्षानंतर पुन्हा महिलाराज पं.स.संग्रामपुर येथे आल्याचे दिसत आहे.
मलकापूर : सभापती श्रीमती संगीता दादाराव तायडे (भाजपा) व उपसभापती श्रीमती सिमाताई बगाडे (भाजपा), लोणार: श्रीमती निर्मला रोहीदास जाधव (शिवसेना) व उपसभापती श्रीमती अरूणा निलेश महाजन (रा.काँ), चिखली : सभापती संजय पांढरे (काँग्रेस) व उपसभापती जितेंद्र कलंत्री (भाजपा), शेगांव : सभापती विठ्ठल भास्कर पाटील (भारीप-बमसं) व उपसभापती श्रीमती शालीनी सुखदेव सोनोने (भारीप-बमसं), सिंदखेड राजा : सभापती राजेश श्रीपत ठोके (रा.काँ) व उपसभापती श्रीमती गीता सुका जाधव (भाजप), देऊळगांव राजा : सभापती श्रीमती रजनी राजेंद्र चिट्टे (रा.काँ) व उपसभापती हरीभाऊ गंगाराम शेटे (रा.काँ), खामगांव : सभापती श्रीमती उर्मिलाताई गायकी (भाजपा) व उपसभापती भगवानसिंग सोळंकी (भाजपा), मेहकर : सभापती श्रीमती जया खंडारे (शिवसेना) व उपसभापती राजूभाऊ धनवट (शिवसेना), मोताळा : सभापती श्रीमती पुष्पा उखा चव्हाण (काँग्रेस) व उपसभापती सरस्वती रामदास भोरे (शिवसेना) या प्रमाणे पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडण्यात आले.