नांदूरा पं.स.सभापती पदी सौ.अर्चना पाटील तर उपसभापती पदी सौ.सुनिता डिवरे विराजमान
बुलडाणा, दि. 15 - पंचायत समिती नांदुरा सभापती उपसभापती पदासाठी 14 मार्च रोजी सभागृ्रहत मतदान घेण्यात आले. यावेळी 8 सदस्य उपस्थित होते. सभापती पदी काँग्रेसच्या सौ.अर्चनाताई शिवाजीराव पाटील 5 मते घेऊन विजयी झाल्या तर शिवसेनेच्या सौ.सुनिता संतोष डिवरे अविरोध उपसभापती झाल्या.
नांदुरा पंचायत समीती सदस्य संख्या 8 असुन पक्ष निहाय सदस्य संख्या अशी आहे. कॉग्रेस 4, शिवसेना 3, भाजपा 1 यावेळी सभापती पदासाठी कॉग्रेस पक्षाचे सौ.निता भगवान धांडे व सौ.अर्चना शिवाजीराव पाटील असे दोन अर्ज भरण्यात आले येथुन राजकीय खेळी सुरू झाली. मतदान घेण्यात आले. यामध्ये कॉग्रेसच्या सौ.निता भगवान धांडे यांना 3 मते मिळाली तर कॉग्रेसच्या सौ.अर्चना शिवाजीराव पाटील यांना 5 मते मिळाली ही ही पाच मते कॉग्रेस 1, सेना 3, भाजपा 1 अशी होती. यावेळी हात वर करूण मतदान घेण्यात आले. उपसभापती पदासाठी सौ.सुनिता संतोष डिवरे यांचा एकच अर्ज असल्यामुळे त्या अविरोध सभापती झाल्या.

