Breaking News

पुण्यात महापौरपदी भाजपच्या मुक्ता टिळक यांची निवड

पुणे, दि. 15 - पुण्याच्या आजवरच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर झाला आहे. मुक्ता टिळक यांची पुण्याच्या महापौरपदी निवड  झाली आहे. महापौरपदासाठी झालेल्या मतनोंदणीमध्ये त्यांना सर्वाधिक 98 मते मिळाली.
यानिमित्ताने भाजपने पुण्यात मोठा विजय मिळवला. एकूण 162 पैकी भाजपचे 98 नगरसेवक निवडून आल्यामुळे भाजप उमेदवाराला महापौरपदासाठी स्पष्ट  बहुमत मिळाले. मुक्ता टिळक यांनी भाजपकडून  उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या नंदा लोणकर होत्या. आज महापौरपदासाठी  झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपच्या मुक्ता टिळक विजयी झाल्या.
मुक्ता टिळक यांना 98 तर नंदा लोणकर यांना 52 मते मिळाली. शिवसेनेचे 10 नगरसेवक मात्र तटस्थ राहिले. तर 2 जागा जिंकलेल्या मनसेने निवडणुकीत  सहभागच घेतला नाही. महापौरपदी विराजमान झालेल्या मुक्ता टिळक यांचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, माजी  महापौर प्रशांत जगताप, शहर अध्यक्ष योगेश गोगावले, गटनेते श्रीनाथ भिमाले, आयुक्त कुणाल कुमार यांनी अभिनंदन केले.
शिवसेनेच्या संगीता ठोसर यांनी आज सकाळी ऐनवेळी महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. शिवाय महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहणे पसंत  केले.