Breaking News

जि .प. सदस्या श्‍वेताताई महाले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेलोडी येथे नदीखोलीकरण कामाचा शुभारंभ

बुलडाणा, दि. 30 - नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत उन्द्री गटातून  विजयी झालेल्या जिल्हा परिषद सदस्या तसेच भाजपाच्या प्रदेश  कार्यकारिणी सदस्या श्‍वेताताई महाले पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्राम शेलोडी येथे दि 27 मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन  करण्यात आले  होते दरम्यान त्यामध्ये प्रामुख्याने प्रथम पाऊल वचनपूर्तीचे उन्द्री जिल्हा परिषद गटाच्या विकासाचे या ध्येयपुर्तीसाठी  शेलोडी येथे गावकर्‍यांच्या लोकसहभागातून  नदी खोलीकरणाचा शेतकरी हिताचा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला. 
 प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून नदी खोलीकरणाचा नारळ फोडुन श्‍वेताताई महाले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला  दरम्यान नदी खोलीकरणामुळे शेतकरी खर्या अर्थाने सुजलाम सुफलाम होणार आहे. यासाठी हवी ती मदत करायला तयार असल्याची ग्वाही श्‍वेताताई महाले यांनी  दिली.
यावेळी करवंड पंचायत समिती सदस्य गजानन इंगळे भाजपा चिखली  तालुका अध्यक्ष सुनील पोफळे , सरपंच मीरा घाटगे, शेलसुर सरपंच संजय रिंढे  , उपसरपंच शिवनाथ नरवाडे , शिवराज पाटील ,विक्की हरपाळे जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा ,बळीराम नरवाडे,  सो सा . अध्यक्ष तुलसीदास नेमाने , अमोल नेमाने  ,हरिदास रसाळ , अशोक नरवाडे , हरिभाऊ नरवाडे ,कैलास घाटगे ,सतीश नरवाडे ,संजय नेमाने संतोष काळे ,सुधाम शेडगे ,निवृत्ती जाधव ,आण्णा  कांबळे  लक्ष्मणराव  रिंढे,  ज्ञानेश्‍वर इंगळे, शिवशंकर रक्ताडे ,प्रभाकर रक्ताडे यासर पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने  कार्यकर्ते व  गावकरी हजर होते .