पल्स पोलीओ मोहीम यशस्वी करावी : मुद्गल
सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) : पल्स पोलीओ मोहिमेचा दुसरा टप्पा 2 एप्रिल रोजी राबविण्यात येणार आहे. या पल्स पोलीओ लसीकरणापासून 0 ते 5 वयोगटातील एकही बाळ वंचित राहणार नाही. याची दक्षता घेऊन पल्स पोलीओ मोहीम 100 टक्के यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी पत्रकार परिषदेत केले.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने उपस्थित होते.
पल्स पोलिओचे दुसरा टप्पा 2 एप्रिल रोजी राबविण्यात येणार आहे. यामध्ये शहरी भागातील 33 हजार 823, ग्रामीण 2 लाख 31 हजार 291 असे एकूण 2 लाख 65 हजार 114 या 5 वर्षाच्या आतील बालकांचे पोलिओचे लसीकरण करण्यात उद्दिष्ट आहे. 5 वर्षाच्या आतील बालकांना शहरी भागात जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी तसेच ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, प्रत्येक गावातील शाळा व अंगणवाडी, वाडी वस्तीवर, बसस्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी लस सर्वांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सर्व विभाग व खासगी वैद्यकीय व्यवसायीक या मोहिमेत काम करणार आहेत.
आरोग्य विभागाने 2 एप्रिल रोजी पल्स पोलीओ लसीकरणासाठी एकूण 2 हजार 450 बुथची स्थापना केली आहे. त्यासोबत एकूण 134 ट्रान्झिट बुथ (रेल्वे स्टेशन, बसस्थानक, टोलनाके) व 168 मोबाईल बुथची (विट भट्ट्या, बांधकामावरील कामगार, ऊसतोड) स्थापना करण्यात आली आहे. त्या करीता 6 हजार 39 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना यापूर्वी कितीही वेळा लस दिली असल्यास अथवा बाळ आजारी असले तरीही 2 एप्रिल रोजी नजीकच्या पल्स पोलिओ बुथवर पोलिओची लस देण्यासाठी बाळाला घेवून जावे, असे आवाहन मुद्गल यांनी पत्रकार परिषदेत केले.