Breaking News

सौ.कोमलताई झंवर यांचा सत्कार

बुलडाणा, दि. 15 - बुलडाणा अर्बन को ऑफ क्रेडिट मल्टीस्टेट सोसायटी चे कार्यक्षेत्र महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात,अंदमान-निकोबार,  ईत्यादी राज्यामध्ये संस्थेचे जाळे पसरले असुन या संस्थेच्या अध्यक्षा कोमलताई सुकेशजी झंवर यांच्या वाढदिवसानिमीत्त गुरू रविदास समता परिषदेच्या वतीने  त्यांच्या राहत्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.
बुलडाणा अर्बन परिवाराने संपूर्ण सहकाराची समृद्ध परंपरा जपली असुन संस्थेची आर्थिक स्थिति बळकट केली आहे, पुणे येथे सभासदांच्या पाल्यासाठी  वसतिगृह, उच्च शिक्षण घेवु इच्छिणारे विद्यार्थींसाठी विशेष कर्ज योजना, तिरूपती व माहुर येथे भक्त निकेतन बुलडाणा येथे 125 मुलींकरीता छात्रनिकेतन सुविधा,  310 वेअर हाऊस बुलडाणा गोरक्षण धाम, विदर्भातील पहीली निवासी शाळा 30 एकर परिसरात प्रशस्त इमारत असुन गोरगरिबांनच्या प्रगती मध्ये या संस्थेचा  मोठा वाटा आहे , सदर संस्था ही संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी सुरवात करून बुलडाणा शहारात छोटेसे रोपटे लावले तर सध्या कार्यरत असलेले चिफ  मॅनेजिंग डायरेक्टर डॉ सुकेशजी झंवर यांनी संपूर्ण भारत भर व भारताच्या बाहेर ही संस्थेचा वटवृक्षात रूपांतर केले आहे , या संस्थेचा गौरव व्हावा म्हणून सौ  कोमलताई सुकेशजी झंवर यांचा अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषदेच्या वतीने वाढदिवसानिमीत्त सत्कार करण्यात आला या वेळी राज्य उपाध्यक्ष के एम  वैरी , जिल्ह्याअध्यक्ष शरद खरात, जिल्ह्याकार्याध्यक्ष अभियंता शिवाजी जोहरे , राज्य प्रवक्ता पुरूषोत्तम बोर्डे, समाधान चिंचोले , अशोक चिंचोले , यशपाल लहाने  , प्रल्हाद वानेरे , राजु गवई, मीलींद मोरे , राहुल जोहरे , उध्ववराव खरात, व असंख्य चर्मकार समाज बांधव उपस्थित होते.