श्री गुरूदेव आश्रम येथे 22 ते 29 मार्च दरम्यान रौप्य महोत्सवाचे आयोजन
बुलडाणा, दि. 15 - पळसखेड सपकाळ येथील गुरुदेव आश्रमाच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या औचित्याने 25 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रोप्य मोहत्सव साजरा करण्यात येणार आहे. यात अखंड हरिनाम सप्ताह व संगीत श्रीमद भागवत ज्ञानयद्न यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वामी श्री हरिचैतन्य महाराज यांनी दिली.
पळसखेड सपकाळ येथील आश्रमात एका पत्रकारपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी हरिचैतन्य महाराज यांनी मोहत्सवाची संपूर्ण रूपरेषा पत्रकारांना सांगितली. 22 मार्च 2017 पासून या मोहत्सवाची सुरवात होणार आहे. यात दररोज हरिकीर्तनाहास भारतातील प्रख्यात संतांच्या प्रवचनाचा लाभ भाविक भक्तांना मिळणार आहे. दररोज सकाळी 9 ते 11 प्रख्यात संतांची प्रवचन 2 ते 5 आचार्य स्वामी श्री हरिचैतन्य महाराज यांच्या मधून वाणीतून भागवत कथा, दुपारीं 5 ते 6.30 पुन्हा प्रवचन व रात्री 9 ते 11 हरीकिर्तन होणार आहे. यामध्ये 22 तारखेला हभप करतं केसरी प्रमोद महाराज जगताप पुणे यांचे हरिकीर्तन, 23 मार्च ला हभप बाबामहाराज इंगळे बीड, 24 मार्च ला कृषिव्याख्याते डॉ. चंद्रकांत जायभाये यांचे प्रवचन व स्वामी अमृतर्शमजी महाराज पुणे यांचे हरिकीर्तन, 25 मार्च बाळूमाहाराज गिरगावकर, 26 मार्च प्रकाश महाराज जवंजाळ तर 27 तारखेला स्वामी रामगिरीजी महाराज सरलाबेट यांचे हरिकीर्तन होईल. 28 मार्चला आचार्य स्वामी श्री हरिचैतन्य महाराज यांचे हरिकीर्तन पार पडेल. सामोरोपीय दिवशी 29 मार्चला सामोरोपीय दिवशी आचार्य स्वामी श्री हरिचैतन्य महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे. यादिवशी हेलिकॉप्टर द्वारे होणार पुष्पवृष्टी करण्याचा माणस महाराजानी बोलून दाखविला. 4 एप्रिल 1992 रोजी आचार्य स्वामी श्री हरिचैतन्य महाराज यांनी गुरुदेव आश्रमाची स्थापना केली. राष्ट्रविकासाच्या कामासाठी भावी पीडी निर्माण व्हावी. त्यांच्यावर अध्यात्मिक संस्कार केले जावेत, भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार वहावा यासाठी गुरुदेव आश्रम गेल्या 25 वर्षापासून कार्यरत आहे. या आश्रमाला कोणताही शासकीय निधी किंव्हा अनुदान मिळत नसून केवळ भक्तांच्या देणग्यावर याठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. आपण विश्वाच्या सेवेची नोकरी स्वकारली असून आपल्या विचारातील धर्म व्यापक असल्याचे सांगत हा आश्रम गरिबांच्या सहकायार्तून गरिबांसाठी चालविण्यात येत असल्याचे आचार्य स्वामी श्री हरिचैतन्य महाराज यांनी स्पष्ट केले. याठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात इयत्ता 8 वी ते 12 वी पयर्ंत शाळा सुद्धा चालविली जाते.
गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यासाठी निवासाची व्यवस्थाही आश्रमात करण्यात आली आहे. तसेच गोशाळा सारखे विविध सामाजिक उपक्रमही महाराज राबवित आहेत. आता कर्मकांडाचे दिवस गेले आहेत. आजचे युग विचारांचे आहे त्यामुळे या मोह्स्तवात केवळ ईश्वराची तापशचर्या नाही तर समाजची सेवा आणि सामाजिक प्रबोधन करणारे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामस्वच्छता, शेतकरी आत्महत्या, अंधर्शद्धा निर्मलून आदी विषयांवरही या कार्यक्रमात प्रबोधन करण्यात येणार असल्याची माहिती हरिचैत्यन्य महाराजानी दिली. या महोत्सवासाठी चार एकरात एक मोठा मंडप उभारण्यात येणार असून या मंडपाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत पार पडला. महोत्सवादरम्यान सात दिवस याठिकाणी येणार्या भाविकांसाठी आरोग्य शिबीर, राहण्याची भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमाचे दिशा चॅनेलवर थेट प्रेक्षपण करण्याची सुविधाही करण्यात आली आहे. तरी या धार्मिक व प्रभोधनात्मक कार्यकांचा पंचक्रोशितील जनतेने लाभ घ्यावा असे आहवण आचार्य स्वामी श्री हरिचैतन्य महाराज व गुरुदेव आश्रमाच्या व्यवस्थापनच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी प्राचार्य वासुदेव बोरे, श्री कापसे यांच्यासह आश्रमातील पदाधिकार्यांची उपस्थिती होती.