उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून जाणार नाही - राजनाथ सिंग
नवी दिल्ली, दि. 15 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून आपले नाव चर्चेत असल्याच्या गोष्टीत काही तथ्य नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केले. या गोष्टीत खरोखरच काही तथ्य नाही. या चर्चा अनावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. राजनाथ सिंग हे लखनौमधून लोकसभेवर निवडून गेले आहेत. 15- 16 वर्षांपूर्वी राजनाथ सिंग यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदीपदाची धुरा सांभाळली होती . त्यामुळेच या पदासाठी सिंग यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेला सिंग यांच्या खुलाशामुळे पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पुढे आहे. मौर्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना उत्तर प्रदेशमधील ऐतिहासिक विजयाबाबत शुभेच्छा दिल्या.
