राजस्थानमध्ये हवाई दलाचे सुखोई -30 लढाऊ विमान कोसळले
नवी दिल्ली, दि. 15 - राजस्थानमधील बाडमेरजवळ सरावादरम्यान हवाई दलाचे सुखोई -30लढाऊ विमान कोसळले. विमानातील दोन्ही वैमानिक सुरक्षित असून या घटनेत शिवकर गावातील तीनजण जखमी झाले आहेत.उत्तरलाई हवाई तळावर विमान उतरण्याआधी हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातात दोन्ही वैमानिक सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी तपास करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
